IMPIMP

BJP MLA Gopichand Padalkar | ‘त्या’ वेळी अजित पवारांच्या मागे 2 आमदार राहिले नाहित, आता एकनाथ शिंदेच्या मागे 50 आमदार आहेत, हेच सुप्रिया सुळेंना रुचले नाही

by nagesh
 Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar says the disputed land in miraj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. फक्त शरद पवार (Sharad Pawar) साहेबच राज्यात राजकीय बदल करु शकतात, असा गैरसमज सुप्रिया सुळेंचा झाला आहे. त्यांना वाटतं की त्यांचे वडीलच केवळ राज्याच्या राजकारणात बदल करु शकतात. असं असताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांच्या या समजाला छेद दिला आहे त्यांना पटलं नाही. एका सर्वसामान्य माणसाला भाजपने मुख्यमंत्री पदाची संधी दिली. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याला मुख्यमंत्री (CM) केल्याचं सुप्रिया ताईंना पटलेलं नाही, अशा शब्दात गोपीचंद पडळकर ((BJP MLA Gopichand Padalkar) यांनी निशाणा साधला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार यांनी भाजपसोबत

अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत सरकार बनवले होते तेव्हा त्यांच्यामागे दोन आमदार राहिले नाहीत. आता एकनाथ शिंदेंच्या मागे 50 आमदार आहेत. हे सुप्रिया सुळेंना रुचलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही लोकांच्या घरी जात आहेत. मात्र, याचाही त्यांना त्रास होतोय. वाईट वाटतंय. हे सगळं द्वेषातून होतंय, असे पडळकर म्हणाले.

 

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राज्याला मागच्या अडीच महिन्यापासून पालकमंत्री (Guardian Minister) नाही. त्यामुळे लोकांना कुठे तक्रार करावी हेच कळत नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. तसेच मी गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांची वेळ मागत आहे. मात्र मला वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. पण मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. तसेच एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी रविवारी केली होती.

 

 

Web Title: BJP MLA Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar criticize ncp leader mp supriya sule in mumbai

 

हे देखील वाचा :

Arvind Sawant | आधी ‘पटक देंगे’ म्हटलं आणि नंतर अमित शाह मातोश्रीवर आले, शिवसेनेचा पलटवार

Warm Water Effects | गरम पाणी पिण्याने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या यामागील सत्य

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

 

Related Posts