IMPIMP

Rahul Narwekar | ‘आणखी सकारात्मक बदल होणार असतील तर…’, जपान दौऱ्यावरुन आलेल्या राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

by nagesh
 Rahul Narwekar | vidhansabha speacker rahul narvekar japan visit ajit pawar joining bjp with 40 mlas

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्यावर अजित पवारांनी स्पष्टिकरण देऊन चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे जपान दौरा (Japan Tour) अर्धवट दौरा सोडून महाराष्ट्रात परत आले. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, आता स्वत: राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जपान दौऱ्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्रात राजकीय बदल होणार आहेत का? कारण तुमी तुमचा जपान दौरा अर्धवट सोडून आला आहात, असे विचारले असता राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, माझा जपान दौरा अर्धवट राहिलेला नाही. माझा दौरा अगदी यशस्वी झाला आहे. जपानला गेल्यानंतर आम्ही तेथील अनेक मुलभूत सुविधांच्या प्रकल्पांची पाहणी केली आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचीही (Waste Management Project) पाहणी केली. जपानमधील सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून महाराष्ट्रात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

सध्या सगळं व्यवस्थित सुरु आहे

महाराष्ट्रात बदलाचं वातावरण पाहायला मिळत आहे, काही राजकीय बदल होऊ शकतो का? यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, सध्या राज्यात सगळं व्यवस्थित सुरु आहे. सभागृह आणि शासनही व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे तुम्ही नेमका कोणता बदल म्हणत आहात, याची मला कल्पना नाही. शासनाच्या कामाचा वेग चांगला पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

सकारात्मक बदल होणार असतील तर…

विधीमंडळ सदस्य अत्यंत चिकाटीने काम करत आहेत. दिवसातील साडेनऊ तास कामकाज झालं आहे.
दीडशेहून अधिक लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. अशा एकंदरीत राजकीय स्थितीत आणखी सकारात्मक बदल
होणार असतील तर त्याचं स्वागतच होईल, असं सूचक विधान राहुल नार्वेकर यांनी केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अगदी वेळेत आलो

वेळेच्या आधी जपान दौऱ्यावरुन परत येण्याचे कारण विचारलं असता नार्वेकर म्हणाले, मी वेळेच्या आधी जपान दौऱ्याहून परत आलो नाही. अगदी वेळेत आलो आहे. जपान मधील सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून मी याठिकाणच्या महत्त्वाच्या बैठका उरकण्यासाठी आलो असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Rahul Narwekar | vidhansabha speacker rahul narvekar japan visit ajit pawar joining bjp with 40 mlas

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-सोमवार पेठ क्राईम न्यूज : समर्थ पोलिस स्टेशन – 9 टक्के मोबादला देण्याच्या आमिषाने 81 लाख 50 हजाराची फसवणूक

Gautam Adani | गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा; तपशील गुलदस्त्यात

MNS Anil Shidore | राज्य सरकारच्या मराठी विषयाबाबतच्या ‘त्या’ निर्णयानंतर मनसेकडून कडाडून विरोध, म्हणाले…

 

Related Posts