IMPIMP

Pune : लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक (PI), सहायक पोलीस निरीक्षक (API) एसीबीच्या जाळ्यात

by bali123
Satara ACB Trap | Two people, including a police sub-inspector, are in the net of anti-corruption pune in a bribery case of two lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – pune rural police | राज्याच्या पोलीस दलात खळबळ उडवून देणारी कारवाई आज पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस ( pune rural police ) दलातील एक पोलीस निरीक्षक, एका सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला 5 लाखांच्या लाचेची मागणी करून 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (शनिवार) दुपारपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मागणी केलेल्या 5 लाखांपैकी 2.50 लाख रुपये यापूर्वीच घेतले होते. 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व त्यांचे कर्मचारी महेश दौंडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून, कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, या प्रकरणात अटकदेखील झाली आहे. त्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. यासाठी गुन्ह्याचा तपासी अंमलदार यांच्या कोर्टात म्हणणे सादर करण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत. मात्र, कोर्टाने तक्रारदार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तक्रारदार यांनी सेशन कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला.

त्यावेळी कोर्टात पैसे देण्यासाठी पुन्हा 1 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
यावेळी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Posts