IMPIMP

Yerawada Jail Pune Crime News | पुणे : येरवडा कारागृहात पोलीस कर्मचाऱ्यावर कैद्यांकडून हल्ला, पोलीस हवालदार जखमी

by sachinsitapure

पुणे :  – Yerawada Jail Pune Crime News | येरवडा कारागृहातील कैद्यांनी पोलीस हवालदारावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे (Attack On Police Havaldar). कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला काठीने बेदम मारहाण केली. कैद्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये पोलीस कर्मचाराऱ्याचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. नानासाहेब मारणे असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी तीन कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नानासाहेब मारणे यांनी फिर्य़ाद दिली आहे. पोलीस हवालदार मारणे रविवारी (दि. 6) येरवडा कारगृहात गस्त घालत होते. कारागृहातील सी.जे. विभागात नवीन प्रवेशद्वाराचे काम सुरु आहे. त्याठिकाणी दगडी भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीचे काम सुरु असल्याने या भागातून ये-जा करण्यास मनाई केली आहे. कारगृह रक्षक मारणे तेथे थांबले होते. त्यावेळी तेथून तीन आरोपी जात होते. मारणे यांनी तिघांना तेथून जाण्यास मनाई केली. भिंतीचा दगड लागला तर इजा होईल असे मारणे यांनी कैद्यांना सांगितले.

मारणे कैद्यांना समजावून सागत असताना याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. त्यांना काठीने बेदम मारहाण केली. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीचा घाव मारणे यांच्या मनगटावर बसल्याने त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. मारणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी तिन कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश अहिरे करीत आहेत.

Related Posts