IMPIMP

पोलीस मुलाचा प्रताप, पिस्तुलाचा धाक दाखवून मुलीला घरातून पळवून नेलं

by bali123
policemans son

जयपूर : वृत्तसंस्था policemans son | एका गाव गुंडाने फिल्मी स्टाइलमध्ये येऊन एका मुलीचे तिच्या घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील गंभीर बाब म्हणजे हा गाव गुंड एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा ( policemans son ) आहे. आरोपी जीप घेऊन मुलीच्या घरी पोहाेचला. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून मुलीला घरातून बाहेर आणले. यावेळी त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांना त्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तो मुलीला घेऊन पळून गेला. चित्रपटाला शोभेल अशी ही घटना जयपूरमधील किशनगंज हौसिंग बोर्डाजवळ घडली आहे.

आरोपीचे वडील किशनगड येथे हेड पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तैनात असून, आरोपी मुलीला घेऊन जात असताना त्याला कोणीही थांबवू शकले नाही. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने घराच्या बाहेर येऊन हवेत गोळीबार केला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याबाबत नागरिकांनी सांगितले की, आरोपीने मुलीच्या घरात घुसून तिला जबरदस्तीने बाहेर ओढत आणले. त्यामुळे आरडाओरडा झाल्याने आम्ही घटनास्थळी आलो. मात्र, आरोपीच्या हातात पिस्तूल असल्याने आम्ही घाबरून गेलो. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आले.
पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून मुलीची सुखरूप सुटका करावी, असे नागरिकांनी सांगितले.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आरोप केला आहे की,
हेड कॉन्स्टेबलचा मुलगा सुनील याच्या विरोधात आम्ही अनेक वेळा तक्रार घेऊन गेलो होतो.
मात्र, त्या ठिकाणी आमचे कोणीही ऐकून घेतले नाही.
सध्या आम्हाला आमच्या मुलीची चिंता वाटत असून,
तिची लवकरात लवकर सुटका करावी,
अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.

Related Posts