IMPIMP

Buldhana Crime News | 26 वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; बुलढाणामधील घटना

by nagesh
Buldhana Crime News | 26 years old girl found dead after falling from moving train

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – बुलढाण्यामध्ये (Buldhana Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नियमित ड्युटीवर जाणाऱ्या तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड (Sundarkhed) या ठिकाणी घडली आहे. पूर्णिमा दिनकर इंगळे Poornima Dinkar Ingle (वय वर्ष 26) असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत पूर्णिमा यांची मावशी मीना रामकृष्ण जाधव (Meena Ramakrishna Jadhav) यांनी 30 मार्च रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात (Buldhana City Police Station) पूर्णिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पूर्णिमा दिनकर इंगळे या बुलढाणा येथील सखी वन स्टॉप (Sakhi One Stop) या कार्यालयात पॅरामेडिकल विभागामध्ये कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी ड्युटीवर जात आहे असे सांगून घरातून निघाल्या. मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचल्या नाही. यानंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण ती कुठेही भेटली नाही. यानंतर अखेर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पूर्णिमा दिनकर इंगळे यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली.

 

यादरम्यान भुसावळ जीआरपीकडून बुलढाणा शहर पोलिसांना एक फोन आला.
यामध्ये एका तरुणीचा मृतदेह भुसावळ–जळगावच्या दरम्यान पाळधी रेल्वे स्टेशन (Paladhi Railway Station) जवळ
सापडल्याचे सांगण्यात आले. या तरुणीचे नाव पूर्णिमा इंगळे आहे. तिच्याकडे मलकापूर ते जळगाव असे प्रवासाचे तिकीट आढळून आले.
ती यावेळी गीतांजली एक्सप्रेसने (Gitanjali Express) प्रवास करत असताना ट्रेनमधून खाली पडली असल्याची माहिती
भुसावळ जीआरपीचे पीआय गिरडे (PI Girde of Bhusawal GRP) यांनी दिली आहे.

 

 

Web Title :- Buldhana Crime News | 26 years old girl found dead after falling from moving train

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोंढवा : पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या पोटात खुपसला चाकू

Ratnagiri News | सभेवरून परतल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्येने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune Crime News | खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी चंदननगरमधील तरुण ताब्यात; पुणे पोलिसांनी युवकाला दिलं मुंबई पोलिसांच्या ताब्यात

 

Related Posts