IMPIMP

Bullock Cart Race Pune | 75 वर्षांच्या नानांचा नादच खुळा, शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा नानांच्या घोडेस्वारीने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

by nagesh
Bullock Cart Race Pune | camera captures the moment of madhukar pachputes horse riding in his seventies

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतींवरील (Bullock Cart Race Pune) बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे (Bullock Cart Race Pune) आयोजन केले जात आहे. नुकतेच पुण्यातील मावळ तालुक्यात (Maval Taluka) बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, या शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले ते चिंचोशीच्या 75 वर्षाच्या नाना उर्फ मधुकर पाचपुते (Nana alias Madhukar Pachpute) यांच्या घोड सवारीने (Horse Riding).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काडं अन् जोकाड जुंपली त्यांच्यापुढे घोडेस्वार म्हणून होते 75 वर्षांचे मधुकर नाना पाचपुते. नाद महाराष्ट्राच्या मातीतला, अंगावर शहारे आणणारा क्षण, घाटात भिररररचा आवाज आला, शर्यतीला सुरुवात झाली अन् नानांची आदाकारी सुरु झाली. घोडेस्वारी करतानाची नानांची आदाकारी, त्यांचा तो थाट, एखाद्या विशितल्या तरुणाला देखील लाजवेल असा होता. त्यांच्या आदाकारीला उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्या-शिट्या वाजवून दाद दिली.

 

 

पाचपुते यांना शर्यतीत बैलजोडीपुढे घोडी पळवण्याचा छंद आहे.
डोक्यावर टोपी, कपाळाला भंडारा, गळ्यात उपरण आणि धोती-कुर्त्याचा पेहराव करुन नाना घोड्यावर स्वार होतात.
वयाच्या पंच्याहत्तरीतही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शरीराची हालचाल भल्याभल्यांना लाजवणारी ठरते. पाचपुते यांना घोडेस्वारीला सुरुवात करुन जवळपास 50 वर्षे झाली. बैलगाडीचा नाद अन् अंगात असलेला हौशीपणा यामुळे त्यांच्यात घोडेस्वारी मुरत गेली. पंचक्रोशीत कोठेही बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race Pune) असली की त्याठिकाणी ते हजर असतात. लगाम न घालताही घोडीला आवरायचे कसब त्यांच्यात असल्याने कितीही बेभान असलेली घोडी ते आवरतात.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत मधुकर पाचपुते म्हणाले, 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शर्यत सुरु झाली.
शर्यत सुरु झाल्याने आनंदाला पारावर राहिला नाही.
बैलगाडा शर्यत ही आमच्यासाठी जीव की प्राण.
त्यामुळे घोडीवर बसून शर्यतीचे सारथ्य करणे हे जिकरीचे असले तरी त्यात मिळणाऱ्या आनंदाला सीमा नाही.

 

Web Title :- Bullock Cart Race Pune | camera captures the moment of madhukar pachputes horse riding in his seventies

 

हे देखील वाचा :

Shiv Jayanti | शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, जाणून घ्या नियमावली?

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात थंडी परतीच्या वाटेवर? अनेक जिल्ह्यात पारा चढला; जाणून घ्या पुण्यातील हवामान?

Gulabrao Patil | … तर मी बांगड्या घालून बसलेलो नाही, गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

 

Related Posts