IMPIMP

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात थंडी परतीच्या वाटेवर? अनेक जिल्ह्यात पारा चढला; जाणून घ्या पुण्यातील हवामान?

by nagesh
Maharashtra Weather Update | temperature rise in some district of maharashtra know latest weather in pune Indian Meteorological Department (IMD) reports

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची (Cold Wave) लाट उसळली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरून गारठा वाढला होता. एकिकडे पाऊस (Rain) आणि दुसरीकडे गारठा यामुळे थंडीचा कडाका लागला होता. सध्या उत्तरेत पावसाचा जोर कमी झाला आहे. आगामी 24 तासामध्ये तामिळनाडूसह अनेक ठिकाणी पाऊस कोसळणार असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विशेष म्हणजे मागील 3 ते 4 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अनेक ठिकाणी पारा घसरला होता. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या सुमारास दाट धुक्यासह गारठा वाढला होता. परंतु, त्यानंतर आता महाराष्ट्रातून थंडी परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झालंय. त्यामुळे पुणे (Pune) मुंबईसह (Mumbai) अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात वाढ झालीय. दरम्यान याचा परिणाम हा महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, नागपूर आणि जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अंशत: थंडीचं वातावरण निर्माण झालंय. (Maharashtra Weather Update)

 

 

सध्या दक्षिण भारतात (South India) ईशान्येकडील वारे सक्रीय झाले आहे. एकंदरीत परिणाम म्हणून आगामी तीन ते चार दिवसामध्ये दक्षिण तामिळनाडू (South Tamil Nadu) आणि दक्षिण केरळमध्ये (South Kerala) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच, आगामी 5 दिवस अंदमान निकोबार (Andaman Nicobar) आणि लक्षद्वीप बेटांवर (Lakshadweep Islands) अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसामध्ये महाराष्ट्रात थंडी कमी होण्याची शक्यता आहे. आज (सोमवारी) पुणे जिल्ह्यात (Pune) सर्वात कमी तापमानाची नोंद माळीण आणि पाषाण याठिकाणी झाली असून दोन्ही ठिकाणी तापमानाचा पारा 12.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तसेच, आगामी पाचही दिवस पुण्यात कोरडं हवामान (Dry weather) राहणार असून तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान राहणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे परिसरातील तापमान –

हवेली (Haveli) 12.6

राजगुरूनगर (Rajgurunagar) 12.6

NDA 12.7

शिरूर (Shirur) 13.0

तळेगाव (Talegaon) 13.0

उर्वरित पुणे जिल्ह्यातील किमान तापमान 13 ते 20

 

Web Title :- Maharashtra Weather Update | temperature rise in some district of maharashtra know latest weather in pune Indian Meteorological Department (IMD) reports

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | … तर मी बांगड्या घालून बसलेलो नाही, गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

Amruta Fadnavis | व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांचं स्पेशल ट्विट; म्हणाल्या – ‘तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात”

Anushka Sharma | …म्हणून अभिनेता Allu Arjun सोबत काम करण्यासाठी अनुष्का शर्माने दिला नकार

 

Related Posts