IMPIMP

Shiv Jayanti | शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, जाणून घ्या नियमावली?

by nagesh
Dasara Melava 2022 | ncps banner for shivsenas uddhav thackeray Dasra Melava 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या (Home Department Proposal) प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा (Shiv Jayanti) साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

येत्या शनिवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणा स्थळावरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

दरम्यान मागील दोन वर्षात कोरोना माहामारीच्या (Corona Epidemic) संकटामुळे राज्यात शिवजयंती सह इतर उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील दोन वर्षात, सण, उत्सव, जयंतीवर कोरोनाचे निर्बंध (Restriction) लागू करण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने (State Government) शिवजयंती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

 

Web Title :-  Shiv Jayanti | CM uddhav thackeray instructions issued regarding shiv jayanti celebrations

 

हे देखील वाचा :

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात थंडी परतीच्या वाटेवर? अनेक जिल्ह्यात पारा चढला; जाणून घ्या पुण्यातील हवामान?

Gulabrao Patil | … तर मी बांगड्या घालून बसलेलो नाही, गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

Amruta Fadnavis | व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांचं स्पेशल ट्विट; म्हणाल्या – ‘तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात”

 

Related Posts