IMPIMP

Business Ideas | फ्रेंचायजी घेऊन सुरू करू शकता हे ५ बिझनेस, होईल मोठा नफा – चेक करा ऑफर?

by nagesh
Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Ideas | तुम्ही कोणताही पैसा न गुंतवता तुमचा व्यवसाय सुरू (How to start own business) करू शकता आणि दर महिन्याला मोठी कमाई (Earn money) करू शकता. कोणत्या कंपन्यांची आणि कशी फ्रँचायझी घेऊ शकता ते जाणून घेऊया (Business Ideas) :

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१. Aadhar card Franchise –
तुम्ही आधार कार्ड फ्रँचायझी घेऊ शकता. जर तुम्हाला आधार कार्डची फ्रँचायझी (Aadhaar Card Franchise) हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला UIDAI द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. त्यानंतर सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचे लायसन्स दिले जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरवरून नोंदणी करावी लागेल.

 

२. SBI ATM Franchise –
व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI एटीएम फ्रँचायझी घेऊ शकता. मात्र, एटीएम फ्रँचायझी घेण्यासाठी, तुमच्याकडे एक जागा असणे आणि काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणतीही बँक कधीही स्वतःचे ATM बसवत नाही. त्यासाठी बँकेकडून काही कंपन्यांना ATM बसवण्याचे कंत्राट दिले जाते. या एटीएम इन्स्टॉलेशन कंपन्या वेगळ्या आहेत, ज्या सर्वत्र ATM बसवण्याचे काम करतात. तुम्हालाही तुमच्या जागेत एटीएम बसवायचे असेल तर तुम्ही त्याची फ्रँचायझी घेऊ शकता.

 

३. Post office Franchise –
पोस्ट ऑफिसकडून पोस्ट ऑफिस फ्रँचायझी दिली जात आहे म्हणजे तुम्ही पोस्ट ऑफिस उघडून पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिसद्वारे दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात. यामध्ये, पहिली फ्रँचायझी आउटलेटची आणि दुसरी पोस्टल एजंट्सची आहे. फ्रँचायझी घेण्यासाठी फक्त ५००० रुपये खर्च करावे लागतील. फ्रँचायझी मिळाल्यानंतर कमिशनद्वारे कमाई करू शकता. (Business Ideas)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

४. Amul Franchise –
अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत आहे. पहिले अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी. जर तुम्हाला पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर २ लाख रुपये गुंतवावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही दुसरी फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ५ लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये २५ ते ५० हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील.

 

५. IRCTC Ticket Agent –
IRCTC च्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त तिकीट एजंट (Ticket Agent) बनायचे आहे. ज्याप्रमाणे रेल्वे काउंटरवर क्लर्क तिकीट (Railway ticket counter) देतात, त्याचप्रमाणे तुम्हालाही प्रवाशांना तिकिटे द्यावी लागतील.

 

Web Title :- Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

 

हे देखील वाचा :

Sovereign Gold Bond | सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी, आज गमावल्यास होईल मोठे नुकसान

सर्व LIC धारकांसाठी महत्वाची सूचना! KYC करण्यापूर्वी वाचा ही बातमी, विमा कंपनीने जारी केली नोटीस

Pune Crime | स्वारगेट परिसरात प्रवाशांना लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Related Posts