IMPIMP

Cabinet Expansion | शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये कुणाचा वरचष्मा? कोणत्या अपक्ष आमदारांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी; जाणून घ्या

by nagesh
Cabinet Expansion | know how many independent mlas will be minister in eknath shinde and devendra fadnavis government

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनCabinet Expansion | राज्यात स्थापन झालेल्या नवीन शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळात कुणा-कुणाची वर्णी लागणार, मंत्रिमंडळात भाजपाचा वरचष्मा असणार का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. कारण मंत्रिमंडळ निवडण्याची (Cabinet Expansion) हालचाली सुरू झाल्या आहेत. 11 जुलै रोजी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल आल्यानंतर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे गट (Shinde Group), भाजपा (BJP) आणि अपक्ष आमदारांनी (Independent MLA) हालचाली सुरु केल्या आहेत. अनेक अपक्षांनाही नवीन सरकारमध्ये मंत्रिपदाची (Cabinet Expansion) आस लागून राहिली आहे. शिंदे गटातील बंडखोर मंत्र्यांना खाते बदलून हवे आहे. तर काहींना कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. तर काहीजण किमान महामंडळ मिळावे, या अशी अपेक्षा करत आहेत. काही माजी आमदारही संधी चाचपणी करत आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांना मंत्री निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे काल नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सरकारच्या विस्तारावर भाष्य केलं. आम्ही राजकीय घडामोडीमुळे आमच्या मतदारसंघात आलो नव्हतो. आता शपथ घेतल्यावर मतदारसंघात आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (CM Eknath Shinde) ठाण्याला गेले नव्हते. तर मीही नागपुरात आलो नव्हतो. त्यामुळे आता मतदारसंघात आलो आहोत. मुंबईत गेल्यावर आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आणि इतर गोष्टी सर्व ठरल्यावर तुम्हाला सांगू, असं फडणवीस यांनी कालच सांगितलं होतं.

 

फॉर्म्युला काय असेल?
शिंदे गट आणि भाजपचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला असून शिंदे गटाला 6 कॅबिनेट मंत्री पदांसह एकूण 14 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. तर भाजपला 27 ते 29 मंत्रिपदे मिळतील. शिंदे गटाकडून सर्व बंडखोर आमदारांना (Rebel MLA) मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. मात्र, त्यातील राज्यमंत्र्यांना बढती मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेषता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार का? संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडे वन खाते येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बच्चू कडू, जैस्वाल यांची मंत्रिपदे निश्चित मानली जात आहे.
बच्चू कडू यांच्यासह संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे सुद्धा सामाजिक न्याय विभागासाठी इच्छुक आहेत.
तसेच आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Cabinet Expansion | know how many independent mlas will be minister in eknath shinde and devendra fadnavis government

 

हे देखील वाचा :

जाणून घ्या SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे

Pune PMC Water Supply | पुणेकरांना दिलासा ! बकरी ईद व आषाढी एकादशीमुळे पुण्यातील पाणी कपातीच्या वेळापत्रकात बदल

Mukhtar Abbas Naqvi | मुख्तार अब्बास नक्वींचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

 

Related Posts