IMPIMP

CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | डॉ. अनिल रामोड यांनी ‘या’ कारणासाठी घेतली 8 लाखाची लाच, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | Dr. Anil Ramod took a bribe of 8 lakhs for ‘this’ reason, know the case

नितीन पाटील

पुणे – CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | पुण्याच्या महसूल विभागातील अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड (Additional Revenue Divisional Commissioner Dr. Anil Ganpatrao Ramod) यांनी माळशिरस येथील भू संपादन (Land acquisition In Malshiras) प्रकरणात 8 लाख रूपयाची लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे (Pune Bribe Case). दरम्यान, डॉ. अनिल रामोड यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) पथकाने अटक केली आहे. त्यांच्या औंध-बाणेर (Aundh-Baner) आणि नांदेड (Nanded) येथील बंगल्यावर देखील सीबीआयची छापेमारी (CBI Raid In Pune) सुरू आहे. (CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराची जमिन माळशिरस येथे आहे. त्यांची जमीन महामार्गालगत आहे. शासनाचे त्याचे भू-संपादन केलेले आहे. त्याचा मोबदला लवकर देण्यासाठी डॉ. अनिल रामोड (IAS Dr. Anil Ramod) यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार दिली होती.

शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी डॉ. अनिल रामोड यांनी 8 लाख रूपयाची लाच घेतली.
त्यानंतर डॉ. रामोड यांना सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलं.
त्यांना चौकशीसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नेले (Divisional Commissioner Office Pune). दरम्यान, डॉ. रामोड यांच्या औंध-बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटीतील (Rutuparna Society Pune) बंगल्यावर आणि नांदेड येथील घरावर सीबीआयच्या पथकाने छापेमारी सुरू केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अखेर सीबीआयच्या पथकाने माळशिरस येथील भू-संपादन
प्रकरणात 8 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना अटक केली आहे.
महसूल विभागातील बडया अधिकार्‍याला अटक झाल्याने
राज्य महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे (CBI Arrest IAS Officer In Pune).
सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरमेठ (IPS Sudhir Hiremath) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title : CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | Dr. Anil Ramod took a bribe of 8 lakhs for ‘this’
reason, know the case

Related Posts