IMPIMP

Chandni Chowk Bridge | जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी; NDA चौकातील काम अंतिम टप्प्यात

by nagesh
 Chandni Chowk Bridge | Inspection of works in Chandni Chowk area by District Collector; Work at NDA Chowk in final stage

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) Chandni Chowk Pune राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे National Highway Authority Of India (NHAI) करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल (Chandni Chowk Bridge) आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चौकात होत असलेल्या अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (Chandni Chowk Bridge)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम (NHAI Sanjay Kadam), उपव्यवस्थापक अंकित यादव (NHAI Ankit Yadav), प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (RTO Ajit Shinde), एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी (Bharat Todkari), एनडीए चौकातील कामाचे एनसीसी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास आदी उपस्थित होते. (Chandni Chowk Bridge)

 

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी मुळशी ते मुंबई (Mulshi To Mumbai), एनडीए ते मुंबई (NDA To Mumbai), बावधन ते कोथरूड (Bavdhan To Kothrud) आणि मुळशी ते सातारा (Mulshi To Satara) मार्गाची पाहणी केली. मुळशीकडे जाणाऱ्या अंडरपासच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात यावे. त्यासाठी गर्डर टाकण्याचे काम करताना वाहतूकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक मार्गाची माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी ‘सेव्ह लाईफ’च्या शिफारसीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी करण्यात येत असलेली कामे, पालखी मार्गाचे दिवे घाटातील काम आदीविषयीदेखील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दिवे घाटातील कामास लवकर सुरूवात करावी, असे त्यांनी सांगितले.

 

एनडीए चौकातील काम अंतिम टप्प्यात
एनडीए चौकातील (NDA Chowk) वाहतूक सुरूळीत करण्यासाठी करण्यात येत असलेले काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून मे २०२३ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे श्री.कदम यांनी यावेळी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ऑगस्ट अखेर चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पास भेट देऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जूना पूल पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी स्फोटकाद्वारे हा पूल पाडण्यात आला व मुंबई तसेच बंगळूरूकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

 

कायमस्वरूपी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.
तेव्हापासून हे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे. सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामांसाठी एनडीए बाजूचे खडकाचे खोदकाम सुरू आहे.
बावधन बाजूस नवीन पुलासाठी खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी मुंबई ते सातारा किंवा
कोथरूडकडे जाण्यासाठी पाच आणि साताराकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन लेन अशा आठ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध आहेत.
तसेच साताऱ्याकडून एनडीएमार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त दोन मार्गिकादेखील उपलब्ध आहेत.

 

बंगळूरू-मुंबई महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
बावधनकडून साताऱ्याकडे (Bavdhan To Satara) जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ६ चे काम पुढील १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोथरूड-श्रृंगेरीमठ-वारजेमार्गे (Kothrud-Sringeri Math-Warje) साताराकडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्ता आणि
एनडीए ते मुंबई रॅम्प क्र.५ चे काम पूर्ण झाले असून वाहतूकीसाठी हे रस्ते खुले करण्यात आले आहेत.
मुळशी ते कोथरूड या रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पुढील १५ दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे.
या मार्गावरील दोन्ही बाजूच्या भिंतींवर सुंदर चित्रे रंगविण्यात आली आहे.

 

मुळशी ते सातारा रॅम्पचे काम पूर्ण होत असून त्यावरून मुळशीकडून येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.
मुळशी-मुंबई रॅम्पचे कामही पूर्ण झाले असून हा रस्तादेखील वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.
बावधन ते पाषाणकडून कोथरूडकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबईकडून कोथरूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून पुढील एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एनडीए सर्कल सुशोभिकरणाच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या असून त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यास एनडीएकडून सहमती मिळाली असून हे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Web Title :- Chandni Chowk Bridge | Inspection of works in Chandni Chowk area by District Collector; Work at NDA Chowk in final stage

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला

Police Accident News | उभ्या ट्रकला धडकल्याने पोलिसचा दुर्देवी मृत्यू

Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे भोसले पर्यटन विकास आराखड्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार

 

Related Posts