IMPIMP

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

by Team Deccan Express
Chandrakant Patil At Policenama Pune Office | Pune Guardian Minister Chandrakant Patil's goodwill visit to Policenama office, discussion on various topics

पुणे : Chandrakant Patil At Policenama Pune Office | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandraknat Patil) यांनी आज (सोमवार) ‘पोलीसनामा’च्या रमन बाग चौक येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीसनामा ग्रुपचे मुख्य संपादक नितीन पाटील यांच्याशी सामाजिक, राजकीय तसेच विविध विषयांवर चर्चा केली. (Chandrakant Patil At Policenama Pune Office)

 

 

 

 

 

पोलीसनामा ग्रुपचे दैनिक पुणेरी आवाज, डिजीटल क्षेत्रातील अग्रगण्य पोलीसनामा ऑनलाइन (https://policenama.com/) , पुणे समाचार (https://punesamachar.com/), बहुजननामा (https://bahujannama.com/), सरकारसत्ता (https://sarkarsatta.com/), डेक्कन एक्सप्रेस (https://deccanexpress.co/), एनपीन्यूज24 (https://npnews24.com/) आणि आरोग्यनामा ऑनलाइन (https://arogyanama.com/) याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेतली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पोलीसनामाची ख्याती देशभर असून त्याचे लाखो सबस्क्रायबर्स असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. पोलीसनामा ऑनलाइन हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतुन चालते. पोलीसनामाचे ग्रुपचे पुणे समाचार हे हिंदी तर डेक्कन एक्सप्रेस आणि एनपीन्यूज24 हे इंग्रजी भाषेतुन चालतात. हिंदी आणि इंग्रजी वाचकांचा पुणे समाचार, डेक्कन एक्सप्रेस आणि एनपीन्यूज24 ला देखील उत्तम प्रतिसाद मिळतो.

 

 

‘अल्पवधीत पोलीसनामाने खुप मोठी प्रगती केली आहे, हे दिसून येते’ असे म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीसनामा ग्रुपचे मुख्य संपादक आणि सर्वेसर्वा नितीन पाटील यांचे तसेच त्यांच्या टीमचे कौतुक केले.

 

यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक आणि इतर काही महत्वपुर्ण विषयांवर पालकमंत्री चंदक्रांत पाटील आणि पोलीसनामाचे मुख्य संपादक नितीन पाटील यांची चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम पोलीसनामाच्या टीमकडून त्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीसनामा टीमचे सदस्य अजय सोनवणे, प्रसाद गोसावी, अरशीन खान, सोनाली भालेसईन, बळवंत सुर्यवंशी, सचिन सितापुरे, सुयश शेळके, कॅमेरामन ओंकार काटे तसेच विधी सल्लागार अ‍ॅड. कैलास थोरात उपस्थित होते.
भाजप प्रदेशचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे देखील शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.

 

 

विविष विषयांवरील चर्चेनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पोलीसनामा’च्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

 

Web Title :  Chandrakant Patil At Policenama Pune Office | Pune Guardian Minister Chandrakant Patil’s
goodwill visit to Policenama office, discussion on various topics

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts