IMPIMP

Chandrakant Patil At PUWJ | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन

by sachinsitapure
Chandrakant Patil At PUWJ | guardian minister chandrakant patil congratulated the newly elected executive of the puwj

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrakant Patil At PUWJ | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पत्रकार संघास भेट देऊन, नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी सर्व पत्रकार मित्रांशी अनौपचारिक संवाद साधला. (Chandrakant Patil At PUWJ)
Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे पत्रकार संघाची रविवारी निवडणूक संपन्न झाली. पत्रकार पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor) यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी उमेश शेळके, स्वप्नील शिंदे, सरचिटणीस सुकृत मोकाशी, चिटणीस प्रज्ञा केळकर-सिंग, पूनम काटे, खजिनदार पदी अंजली खमितकर यांची निवड झाली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्ष दुधे, वरद पाठक, विक्रांत बेंगळे, शहाजी जाधव, श्रद्धा सिदीड, विनय पुराणिक, गणेश राख, संभाजी सोनकांबळे, शंकर कवडे, भाग्यश्री जाधव यांची निवड झाली. (Chandrakant Patil At PUWJ)

या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

Web Title : Chandrakant Patil At PUWJ | guardian minister chandrakant patil congratulated the newly
elected executive of the puwj

हे देखील वाचा

Related Posts