IMPIMP

Chandrakant Patil | ‘… पण उमेदवार कर्तुत्ववान आणि न्याय देणारा असावा’ ! राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीच्या चर्चेवरुन चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the type of backbiting is not right but sharad pawar told chandrakant patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइनसध्या देशात भाजपविरोधी (BJP) आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीच्या (Presidential Election) रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे. याला शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसनंही (Congress) पाठिंबा दर्शवला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच शरद पवारांना देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मराठी अस्मिता आम्हालाही आहे. देश एक आहे त्यामुळे मराठी, हिंदी भाषिक उमेदवार असं म्हणून चालणार नाही. पण उमेदवार कर्तुत्ववान आणि न्याय देणारा हवा, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार यांना लगावला.

 

भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी – संजय राऊत

भाजपनंच शरद पवार यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केली आहे. ते म्हणाले राष्ट्रपती म्हणून संविधानाचे (Constitution) रक्षण करणारा आणि एक मजूबत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते.

 

काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल, तर याचा मला आनंदच होईल. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे नाना पटोले म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

18 जुलैला होणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी राष्ट्रपतिपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे आणि 21 जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patils reply to sharad pawars discussion on the presidency candidate

 

हे देखील वाचा :

Heart Attack | खुलासा ! ‘हार्ट अटॅक’च्या वेळी हृदयात वेदनांसह आणखी खुप काही होते, जाणून घ्याल तर वाटेल आश्चर्य!

Former MLA Mohan Joshi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही – माजी आमदार मोहन जोशी

ACB Trap On Talathi | उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

 

Related Posts