IMPIMP

Former MLA Mohan Joshi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Mohan Joshi Pune | 'BJP postpones Cantonment Board elections due to fear of defeat' - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनFormer MLA Mohan Joshi | नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसताना काँग्रेस अध्यक्षा (Congress President) खा. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधींना (Rahul Gandhi) बदनाम करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार (BJP Government) दडपशाही करत आहे. परंतु, काँग्रेस त्यापुढे झुकणार नाही, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

केंद्रातील मोदी सरकारचा निषेध मोहन जोशी यांनी केला आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्यामागे गांधी कुटुंबियांना बदनाम करण्याचा डाव आहे. त्यातून ईडीमार्फत काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. ही निव्वळ मनमानी आहे. नेहरु, गांधी कुटुंबाने स्वत:ची संपत्ती देशाला दान दिली. देशासाठी बलिदान दिले. त्या कुटुंबाला ईडीमार्फत त्रास देणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वाढती महागाई, पेट्रोल – डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण,
काश्मीरातील पंडितांची हत्या आणि पलायन या विषयांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार (Modi Government) हे काँग्रेसच्या अध्यक्षा, खा. सोनियाजी गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधी यांच्यावर द्वेषभावनेतून कारवाई करत आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | Congress will not bow to BJPs oppression Former MLA Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

ACB Trap On Talathi | उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

Thane Police Website Hack | जगभरातील मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हान ! प्रेषित अवमान प्रकरणी ठाणे पोलीस दलाची वेबसाईट ‘हॅक’; देशातील सरकारी कार्यालयांच्या अनेक वेबसाईटवर हल्ला

ACB Trap On Police Havaldar | दोन हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पुढील आठवड्यात अभियंता आणि लिपिकांच्या मेगा भरतीसाठी जाहिरात

Related Posts