IMPIMP

Devendra Fadnavis | ‘फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’, भाजपच्या माजी मंत्र्याचं भरसभेत अजब विधान

by nagesh
 Maharashtra Political News | congress nana patole replied bjp dcm devendra fadnavis statement over mahavikas aghadi vajramuth sabha

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप (BJP) नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Former Minister Subhash Deshmukh) यांनी भर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असं अजब वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सरु झाली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग 26 मधील कल्याणीनगर येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे (Budget) कौतुक करताना हे वक्तव्य केलं.

 

सुभाष देशमुख म्हणाले, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार केला आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंतची काळजी घेतली. फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत, असं आश्चर्यकारक विधान देशमुख यांनी केले. सुभाष देशमुख यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा 2023-24 चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महिलांवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. एसटी बस सेवेत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. तर मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले. मुलगी शिकायला गेल्यावर त्यालासुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. परत पाचवी सहावीला गेल्यावर 5 ते 6 हजार रुपये तिच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलीच्या 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील. मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.

 

 

बचतगटाचे मॉल तयार करणार

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना बाजार मिळावा यासाठी मुंबईत बचत गटांचे मॉल तयार केले जाणार आहेत.
बचत गटाच्या उत्पादनाला मुंबईत चांगला बाजार मिळतो कराण त्याठिकाणी सर्वात मोठा बाजार उपलब्ध आहे.
आपणही आपल्या सोलापूरचे उत्पादन तिथं मुंबईतील मॉलमध्ये ठेऊ. त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे देशमुख
यांनी सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | संभाजीनगर राड्यात राष्ट्रवादीचा हात, अजित पवार भाजप खासदारावर संतापले, म्हणाले-‘वेगवेगळ्या पक्षांची नावं घेण्यापेक्षा चौकशी करा, होऊन जाऊद्या…’

MP Arvind Sawant | ‘रिक्षावाला’ शब्दावरुन अरविंद सावंत यांचा यु-टर्न, म्हणाले – ‘तो शब्द शरद पवारांचा नाही, तो शब्द…’

Maharashtra Politics News | ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये जाणार’, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Pune Lok Sabha Bypoll Election | गिरीश बापटांचा वारसदार कोण? BJP कडून 5 नावं चर्चेत तर काँग्रेसचे ‘हे’ 2 नेते इच्छुक

 

Related Posts