IMPIMP

Chandrakant Patil | ‘PM नरेंद्र मोदी 2 तास झोपतात, झोपच लागू नये यासाठी…’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य !

by nagesh
Chandrakant Patil | PM modi only sleeps for 2 hours doing sadhana to prevent sleep say chandrakant patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Prime Minister Narendra Modi) केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) फक्त दोन तास झोपत असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पंतप्रधान मोदी हे फक्त दोन तासच झोपतात आणि 22 तास काम करत आहेत. आता ते झोपच लागू नये याची साधना करत आहेत. देशाने त्यांच्यावर जी गुंतवणूक केली आहे ते ती वाया जाऊ देत नाही. एक एक मिनिट आपला कामासाठी वापरत असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 (Lok Sabha Election 2024) पेक्षा अधिक जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. संसदेत (Parliament) अनेक गोष्टी करायच्या असून त्यासाठी एक तृतीयांश बहूमत पाहिजे, कामाला लागा, असे आदेशही पाटलांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना दिले.

 

दरम्यान, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
त्यावेळी त्यांनी मोदींबाबत हे वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याची सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | PM modi only sleeps for 2 hours doing sadhana to prevent sleep say chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | फक्त 8 वर्षात 10 हजाराचे झाले 6 लाख, आता कशामुळं प्रसिध्दीच्या झोतात आला ‘हा’ केमिकल स्टॉक; जाणून घ्या

How To Get Soft Lips | कोरडे आणि फाटलेले ओठ मुलायम बनवण्यासाठी ‘या’ 3 टिप्ससह करा 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा शैक्षणिक संस्थांना इशारा; म्हणाले – ‘फी न भरल्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक करु नका, अन्यथा…’

 

Related Posts