IMPIMP

Chandrapur Accident News | पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून मृत्यू

by Team Deccan Express
Chandrapur Accident News | petrol-tanker and truck collide each other 6 died shocking video of incident chandrapur

चंद्रपूर : सरकारसत्ता ऑनलाइन   Chandrapur Accident News | चंद्रपूर शहरात भीषण अपघात (Chandrapur Accident News) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर (Petrol Tanker) आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये (Truck) समोरासमोर धडक झाली. त्यानंतर भीषण आग (Fierce Fire) लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू (6 killed) झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावर रात्रभर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. (Terrible accident in petrol tanker and truck)

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ ही घटना घडली. अपघातामध्ये आगीच्या उंच ज्वालांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडले आहे. या अपघाताची माहिती समजताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली. मूल-रामनगर पोलिसांची (Mool-Ramnagar Police) पथके, अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले आहे. आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. (Chandrapur Accident News)

दरम्यान, या भीषण अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोनपैकी एका ट्रकमध्ये लाकूड असल्याची माहिती असून या आगीत चालक-वाहकांचे काय झाले याबाबत अजून माहिती समोर आली नाही. दरम्यान या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस तपास करीत आहेत.

Web Title : Chandrapur Accident News | petrol-tanker and truck collide each other 6 died shocking video of incident chandrapur

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts