IMPIMP

Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case pune news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट बाळासाहेबांची शिवसेना असा वाद सुरु आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या (Andheri East by-Election) पार्श्वभूमीवर हा वाद आणखीणच चिघळला आहे. दोनही गट आरोप आणि प्रत्यारोप यांच्यात गुंतले आहेत. भाजपचे (BJP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयात न येणारे मुख्यमंत्री बघितले आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. त्यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ग्रामीण भागांसाठी देण्यात आलेल्या नीधीवर आणि विकास कामांवर शिंदे यांच्या सरकारने रोख लावत, सर्व कामे थांबविली आहेत. तसेच नीधी देखील रोखला आहे. त्यामुळे शिंदे यांचे आमदार आणि मंत्री नाराज असल्याचे राष्ट्रवादीच्या (NCP)  नेत्यांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हे सरकार पडणार आहे, असे म्हंटले आहे. त्यावर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या आमदारांमध्ये काय सुरु आहे, याची माहिती घेतली पाहिजे. भविष्यात आम्ही असे असे बॉम्ब फोडणार आहोत की त्यांना देखील कळणार नाही काय सुरु आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचे सुचित केले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
हे भाजप आणि शिंदे युती सरकारचे ओपनिंग बॅट्समन आहेत.
ते ज्याप्रकारे अठरा अठरा तास आठवड्याचे सातही दिवस काम करतात,
ते पाहता आगामी काळात महाविकास आघाडीचे काय होईल हे सांगता येत नाही, असे देखील बावनकुळे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | NCP MLAs are in touch with us, Chandrasekhar Bawankule’s big claim

 

हे देखील वाचा :

Swords and Shield Symbol | शिंदेंचे चिन्ह वादात; ’ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

Shanikrupa Heartcare Centre | अ‍ॅन्जिओप्लास्टी नाही, बायपास नाही, विनाशस्त्रक्रिया हृदयरोगावरील उपचार फक्त शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये

MNS | मनसे टेलिकॉम सेनेचा मोठा विजय ! स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट

 

Related Posts