IMPIMP

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

by nagesh
Changes From July 1 | cryptocurrency pan aadhaar link plastic ban and new labor laws know what changes are happening from july 1

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Changes From July 1 | जुलै महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. विविध कर नियम, शेअर बाजार आणि कामगार कायद्यांशी संबंधित बदल 1 जुलैपासून लागू होत आहेत. या बदलांचा तुमच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आपण त्यांच्याबद्दल जागरूक असले पाहिजे. (Changes From July 1)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर (Cryptocurrency Transactions) मिळवलेल्या कॅपिटल्स गेन्सवर निश्चितपणे कर लावणार असले, तरी नवीन कामगार कायद्यांच्या (Labour Codes) अंमलबजावणीबाबत काही निश्चित नाही. 1 जुलैपासून काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

 

क्रिप्टोकरन्सी आणि व्हर्च्युअल डिजिटल असेटवर कर
1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये, व्हर्च्युअल डिजिटल असेट (व्हीडीए) किंवा क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस कापण्याची तरतूद करण्यात आली होती. व्हर्च्युअल असेटसाठी रु. 10,000 पेक्षा जास्त रकमेवर एक टक्का टीडीएस कापण्याची तरतूद सुरू करण्यात आली आहे.

 

त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. 1 एप्रिलपासून या व्यवहारांवर 30 टक्के प्राप्तीकरासह सेस आणि सरचार्ज लागू झाला होतो. व्हर्च्युअल डिजिटल असेट किंवा क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस कसा कापला जाईल याबद्दल सीबीडीटीने एक परिपत्रक जारी केले होते. (Changes From July 1)

सीबीडीटीने सांगितले होते की खरेदीदार आणि क्रिप्टो एक्सचेंज दोघांनाही टीडीएस कापावा लागेल.

 

पॅन-आधार लिंकिंगसाठी जास्त पैसे
सीबीडीटीने 29 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 आहे. मात्र, ज्यांनी अद्याप आधारशी पॅन लिंक केलेले नाही त्यांना या कालावधीत शुल्क द्यावे लागेल.

 

जुनी मुदत चुकवणार्‍यांकडून 30 जूनपर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात आला. ही दंडाची रक्कम 1 जुलै 2022 रोजी किंवा त्यानंतर पॅन आधारशी लिंक केल्यास रु. 1,000 असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टीडीएस/टीसीएस नियमांमध्ये बदल
या महिन्याच्या सुरुवातीला, सीबीडीटीने एखादा व्यवसाय किंवा प्रोफेशनमध्ये प्राप्त नफ्याच्या संदर्भात नवीन टीडीएस तरतुदी लागू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सीबीडीटीने असे म्हटले आहे की अशा अनुलाभ एकतर रोख स्वरूपात किंवा प्रकारात किंवा अंशतः या दोन्ही स्वरूपात असू शकतात.

 

अर्थसंकल्पात प्राप्तीकर कायद्यात नवीन कलम 194आर आणले. यामध्ये प्रत्येक त्या व्यक्तीसाठी 10 टकके डीटीएस कपात आावश्यक आहे, जो कोणत्याही व्यक्तीच्या व्यापार किंवा प्रोफेशनमधून 1 वर्षात 20,000 रुपयांपेक्षा कोणताही जास्त लाभ किंवा अनुलाभ प्रदान करतो.

 

लागू होऊ शकतो नवीन कामगार कायदा
केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी 1 जुलैपासून नवीन कामगार कोड लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचार्‍यांचे कामाचे दिवस कमी होतील. यासोबतच टेक होम सॅलरी वाढवण्यासारखे अनेक फायदे मिळतील.
नवीन लेबर कोडमध्ये कर्मचार्‍यांसाठी आठवड्यातील कामकाजाच्या दिवसांची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव आहे.
अशा प्रकारे, आठवड्यातील कामकाजाचे दिवस 5 वरून 4 पर्यंत कमी केले जाऊ शकतात.

 

मात्र, यामुळे दररोज कामाचे तास वाढतील. तरतुदीनुसार आठवड्यातून 48 तास काम करावे लागणार आहे.
म्हणजेच 9 तासांच्या शिफ्टऐवजी कर्मचारी 12 तासांच्या शिफ्ट करतील.
याशिवाय पीएफ आणि अर्न लीव्ह पॉलिसी सारख्या अनेक तरतुदी आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सिंगल यूज प्लास्टिक मुक्त होईल दिल्ली
दिल्लीत 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात येणार आहे.
बंदी घालण्यात येणार्‍या प्लास्टिक उत्पादनांमध्ये इअरबड्स, फुग्यांच्या प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज,
कँडीच्या प्लास्टिकच्या काड्या, आइस्क्रीमच्या प्लास्टिकच्या कांड्या, थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तू,
प्लास्टिकच्या प्लेट्स, कप, ग्लास, काटे, चमचे, स्ट्रॉ, ट्रे, मिठाई यांचा समावेश आहे. कॅन पॅकिंगसाठी फॉइल,
निमंत्रण पत्रिकेसाठी फॉइल, सिगारेट पॅकिंगमध्ये वापरलेले फॉइल, 100 मायक्रॉनपेक्षा पातळ पीव्हीसी आणि प्लास्टिक बॅनर इ.

डीमॅट खात्यांचे अनिवार्य टॅगिंग
गेल्या आठवड्यात, सेबीने सांगितले होते की स्टॉक ब्रोकर्सची डिमॅट खाती, ज्यांना टॅग केलेले नाही, ती जूनच्या अखेरीस योग्यरित्या टॅग करावी.

1 जुलैपासून, टॅग केल्याशिवाय सिक्युरिटीज डिमॅट खात्यात जमा करता येणार नाहीत.
मात्र, सेबीने एका परिपत्रकात म्हटले आहे की कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये क्रेडिटला परवानगी दिली जाईल.
सेबीने पुढे सांगितले की ऑगस्टपासून टॅग न ठेवलेल्या कोणत्याही डिमॅट खात्यातून सिक्युरिटीज डेबिट केले जाणार नाहीत.

 

Web Title :- Changes From July 1 | cryptocurrency pan aadhaar link plastic ban and new labor laws know what changes are happening from july 1

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

 

Related Posts