IMPIMP

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

by nagesh
CM Eknath Shinde | shiv sainiks will not have to face false cases if this happens cm eknath shinde warns

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार, हे जवळपास निश्चित होतं. मात्र, अखेरच्या क्षणी स्वत: फडणवीस यांनी पुढे येत आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांना मुख्यमंत्री पदासाठी समर्थन देत असल्याची घोषणा करत अवघ्या राज्याला आश्चर्याचा धक्का दिला. जे देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर (State Government) टीका करत होते, त्या फडणवीसांना नेतृत्व करण्याची संधी आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde CM) हाती सत्तेची सूत्रं कशी दिली, याची चर्चा सध्या होऊ लागली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यामागील कारणं

1. उद्धव ठाकरे यांना शह, 2019 चा हिशोब चुकता केला

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (2019 Assembly Election Results) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. तशी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. परंतु शिवसेनेने (Shivsena) भाजप सोबत असलेली युती तोडून राष्ट्रवादी (NCP) – काँग्रेस (Congress) पक्षासोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता स्थापन केली. भाजप एक नंबरचा पक्ष असताना त्यांना विरोधात बसण्याची वेळ आली. तसेच फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (Chief Minister) झाले. आघाडी सरकारने अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केले असताना शिवसेनेच्या 55 पैकी 39 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सहभागी झाले. शिंदे गटामध्ये मुंबई, ठाणे आणि ग्रामीण भागातील अनेक आमदार सामील झाले. त्यानंतर महाराष्ट्र सत्तानाट्य सुरु झाले. अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना 2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं होतं त्याच उद्धव ठाकरेंना स्वत:चाच पक्ष विरोधात उभा करुन मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याची किमया भाजपने केली.

 

2. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सत्तेचा ऑक्सिजन काढला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्थापनेपासून अनेक वर्षे सत्तेत होते. 2014 च्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन होऊन भाजपची सत्ता आली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना विरोधात बसावे लागले. त्यातच 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होईपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना पुन्हा सत्तेत येणं शक्य नव्हत हे 2019 च्या निकालातून स्पष्ट झालं. मात्र निकालानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हे दोन्ही पक्ष शिवसेनेच्या मदतीने सत्तेत आले.  या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पुन्हा सत्तेचा ऑक्सिजन मिळाला आणि कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळाले. आता सरकार कोसळल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाव लागणार आहे.

 

3. मुख्यमंत्री पदाची हाव नसल्याचा संदेश

शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी (Shivsena Rebel MLA) केल्याने मुख्यमंत्रिपद गेल्याने उद्धव ठाकरे यांच्याविषयी राज्यात सहानुभूती निर्माण होत होती. तर दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री पदासाठी ही खेळी केल्याचे आरोप शिवसेनेकडून करण्यात येत होते. यामुळे शिवसैनिकांमध्ये भाजपविषयी तीव्र संताप पाहायला मिळाला. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन आम्हाला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा संदेश देण्याचा भाजपकडून प्रयत्न केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. मुख्यमंत्री पद नसले तरी राज्यात भाजपची सत्ता

एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) हे मुख्यमंत्री होणार असले तरी विधानसभेत 106 जागा असणाऱ्या भाजपला सत्तेत मोठा वाटा मिळणार, हे स्पष्ट आहे.
अर्थमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदाचा मोह टाळला असला तरी महत्त्वाची खाती असल्याने सत्तेची चांगली ताकद भाजपला मिळणार आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने पक्षसंघटन आणखी बळकट करण्यास आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यास भाजपला सोपं जाणार आहे.

 

Web Title :- Eknath Shinde CM | 4 reasons behind bjp giving cm post to eknath shinde maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून अभिनंदन

 

Related Posts