IMPIMP

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

by pranjalishirish
chitra wagh alleged thackeray govt over deepali chavan suicide case

मुंबई : अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ Chitra Wagh  यांनी भाष्य केले आहे.

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

दीपाली चव्हाण यांनी काल सायंकाळी शासकीय निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. दीपाली या गर्भवती होत्या. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत चित्रा वाघ Chitra Wagh  यांनी विधान केल आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या, ‘आज ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला. ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचाही प्रयत्न केला’.

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

तसेच तिला अपमानित केले जात होते. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही? त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

गर्भपात झाला तरीही सुट्टी दिली नाही; सुसाईड नोटमध्ये सांगितलं बरेच काही….

आमझरी दौऱ्यावर असताना ऑक्टोबर 2020 मध्ये प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करू शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. मला सलग तीन दिवस भाकूरमध्ये कच्चा रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण तरीही मला सुट्टी दिली गेली नाही. मला माझ्या सासरी अमरावतीला महिन्यातून एकदाही जाता आले नाही, यासह इतर काही बाबींवर तिने सुसाईड नोटमध्ये माहिती दिली.

Also Read : 

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

‘रश्मी शुक्लांसह पोलीस खात्यातील असे 4 ते 5 अधिकारी शरद पवार आणि आमच्या नजरेत आले होते’

Sharad Pawar : ही बातमी कायम लक्षात राहील

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

 

Related Posts