पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Chitra Wagh | कधीकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या आणि सध्या भाजप नेत्या असलेल्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) आणि रुपाली चाकणकर (NCP Leader Rupali Chakankar) यांच्यामधुन सध्या ‘विस्तव’ देखील जात नाही. राज्य महिला आयोगावर (state woman commission) चाकणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत, यानंतर आता चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा घणाघात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत केला आहे.
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका
अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 14, 2021
विधानसभा निवडणुकीवेळी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून रुपाली चाकणकर यांनी त्यांचावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांच्या नावाची चर्चा होत असताना वाघ यांनी बरोबर ‘टायमिंग’ साधले आहे.
महिला आयोगावर (state woman commission) रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका,
अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असा इशाराही वाघ यांनी ट्विट करत दिला आहे.
Web Title : Chitra Wagh | BJP Leader Chitra Wagh on state woman commission as well as on ncp leader rupali chakankar
- Pune Crime | पोलिसांवर दबाव आणण्यासाठी पोलीस ठाण्यात तिघांचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न
- Pune Corporation | भाजपच्या नेत्याने थेट किरीट सोमय्यांनाच पालिकेत आणल्याने शहर भाजप नेतृत्वाच्या ‘क्षमते’बाबत उलटसुलट चर्चा
- RIL | रिलायन्सची जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये (NexWafe) गुंतवणूक, डेन्मार्कच्या स्टीसडलसह (STIESDEL) सामरिक भागीदारी