IMPIMP

Clove Beneficial In Weight Loss | खरंच वजन कमी करते का लवंग? जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

by nagesh
 Clove Beneficial In Weight Loss | clove beneficial in weight loss weight loss tips lose weight with the help of cloves

सरकारसत्ता ऑनलाइन – Clove Beneficial In Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर लवंगाचा आहारात समावेश करा. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून आणि फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. यामुळे कर्करोग, हृदयविकार, मधुमेह इत्यादी होण्याचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर लवंग खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. (Clove Beneficial In Weight Loss)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याशिवाय लवंग ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. लवंग खाल्ल्याने कोणते फायदे होतात आणि वजन कमी करण्यासाठी ते कसे फायदेशीर आहे? याबाबत जाणून घेवूयात…

 

लवंगेतील पोषकतत्व
आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, फायबर, जीवनसत्त्वे, झिंक, कॉपर, सेलेनियम, थायामिन, सोडियम, मँगनीज, पोटॅशियम इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक लवंगेत असतात. यासोबतच यात अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल गुणधर्म देखील असतात, ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. (Clove Beneficial In Weight Loss)

 

लवंग खाल्ल्याने वजन कमी होते का?
TOI मध्ये प्रकाशित लेखानुसार, लवंगाच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे पचन सुधारते. मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते.

 

हे देखील खरे आहे की मेटाबॉलिज्म रेट कमी झाल्यामुळे वजन वाढते आणि तुम्ही लठ्ठपणाला बळी पडू शकतात. ज्या लोकांना मधुमेह आहे ते देखील त्यांच्या आहारात लवंगेचा समावेश करून वाढत्या वजनावर मात करू शकतात.

 

वजन कमी करण्यासाठी कशी खावी लवंग?
लवंगात असे काही घटक असतात, जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवतात. तुम्ही लवंग चहा, काढा किंवा चघळून सेवन करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

 

लवंगेचे सेवन करताना हे लक्षात ठेवा
डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी लवंग खात असाल तर ती जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा, कारण त्याचा प्रभाव गरम असतो. म्हणून, जर जास्त प्रमाणात खाल्ली तर आतड्यांना हानी पोहोचवू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लवंगेत असलेली रसायने आतड्याच्या कार्यावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. तसेच, लवंगाच्या अतिसेवनामुळे स्नायू दुखणे आणि थकवा येतो.

 

लवंग इतर कोणते फायदे आहेत?

1. हिरड्यांच्या समस्येपासून आराम मिळतो

2. लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर

3. डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त

4. पचनसंस्थेला बूस्ट करते

5. गॅस, अपचन, ब्लोटिंग इत्यादी कमी करते

6. यातील मँगनीज हाडे मजबूत करते

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Clove Beneficial In Weight Loss | clove beneficial in weight loss weight loss tips lose weight with the help of cloves

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार झुलकर खान व प्रमोद भेंडे यांचे जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 5.26 लाखांचा मुद्देमाल जप्त, सह 17 आरोपींविरुद्ध कारवाई

Pune News | नववे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे होणार 9 ऑगस्टला; ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना, तर ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ कवी शिवानुज यांना जाहीर

 

Related Posts