IMPIMP

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार झुलकर खान व प्रमोद भेंडे यांचे जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 5.26 लाखांचा मुद्देमाल जप्त, सह 17 आरोपींविरुद्ध कारवाई

by nagesh
Pune Crime News | Crime Branch raids a .den in Shivane, Uttamnagar area, action taken against 16 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीतील कुख्यात गुन्हेगार झुलकर खान (Jhulkar Khan) व प्रमोद भेंडे (Pramod Bhende) यांच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 5.26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 17 जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) रात्री केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सांगवी स्पायसर रोडवरील (Sangvi Spicer Road) दर्शन रिव्हर साईड हॉटेलमध्ये (Darshan Riverside Hotel) व हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेत बाईकवर पैशावर मटका, सोरट, पंकी पाकोळी, वगैरे जुगार गैरकायदेशीरीत्या खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पंचासमक्ष या ठिकाणी रात्री 11.15 च्या सुमारास छापा टाकून, सोरट, पंकी पाकोळी, मटका जुगार, वगैरे प्रकारचे जुगार खेळणारे तसेच अवैध रीत्या विदेशी मद्याचा साठा (Liquor Stock) व विक्री करणारे आरोपी मिळून आले. तसेच 4 जुगार खेळवणारे, 4 जुगार खेळणारे व पाहीजे आरोपी 9 यामध्ये जुगारासह अवैध विदेशी दारूचा साठा व विक्री करणारे असे एकुण 17 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 व 12 (अ) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

या ठिकाणी अटक/कारवाई केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे.

– मटका व अन्य जुगार घेणारे/रायटर्स/मॅनेजरची नावे. दर्शन रिव्हर साईड हॉटेलमध्ये बसून जुगार खेळणारे आरोपी

जुगार खेळवणारा विजयसिंग दलपतसिंग चौहान, (वय – 30 वर्ष, रा. सर्वे नंबर 10, संत ज्ञानेश्वर नगर, वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव,), सुरज प्रितीश साळुंखे (वय – 33 रा. भैरवनगर, सर्वे नंबर 51, घर नंबर 46/ बी, धानोरी)

 

दर्शन रिव्हर साईड हॉटेल बाहेर मोकळ्या जागेत पार्किंग मध्ये गाड्यांवर जुगार खेळवणारे आरोपी

संकेत नंदू कदम (वय – 23, रा. पाण्याची टाकी, विठ्ठल मंदिरा मागे, बालेवाडी, पुणे), फारुख सैफ खान (वय – २३, रा. रेल्वे क्रॉसिंग जवळ, बोपोडी, पुणे), जुगार खेळवणारा ईश्वर बाबुराव दामोदर (वय – 32, , रा.ठी. पिंपळे गुरव, जगताप पेट्रोल पंपाजवळ, भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव, पुणे)

 

– पैशावर मटका, लॉटरी, सोरट, पंती पाकोळी जुगार खेळणारे खेळी आरोपी

लादे नागेश त्र्यंबक (वय – 28, रा. लक्ष्मी हाइट्स, देशमुख वाडी, शिवणे वारजे पुणे. मुळगाव – तपसे चिंचोली, तालुका औसा, जिल्हा लातूर), सचिन सुभाष सीताफळे (वय – 30, रा. विष्णुराज बिल्डिंग, रूम नंबर 30, ज्योतिबा नगर, काळेवाडी पुणे), मुगलअप्पा बसप्पा कानकुर्ती (वय –  35, रा. 199, अरुण निवास, रामनगर रहाटणी गाव, तालुका हवेली, पुणे)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

– घटना स्थळावरुन पळून गेलेले जुगार अड्डा मालक, विदेशी दारूचा साठा व विक्री करणारे मालक, मॅनेजर व इतर पाहिजे आरोपींची नांवे

जुगार अड्डा मालक व हॉटेल चालक मोहम्मद झुलकार मजहर खान (रा.सायली पार्क, जगताप डेरी रोड, पिंपळे सौदागर, औध कॅम्प, पुणे), प्रमोद रमेश धेंडे (वय – 40, रा. यशदा स्वेयर जवळ, सर्व्हे क्र. १४२/१/२, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे), जुगार मॅनेजर व हॉटेल चालक नवल नहाडे (वय अंदाजे – 35, रा. पिंपळे सौदागर, पुणे), चंद्रकांत कबीर जाधव, (वय अंदाजे 35, रा. बौद्ध नगर, लिंक रोड, पिंपरी कॉलनी, पुणे), असे घटनास्थळावरून पळून गेलेले पाच आरोपी आहेत. त्यापैकी एक आरोपी हा स्विफ्ट कार (MH 12 FF 7788) चा मालक आहे. तर एक आरोपी हा लाल रंगाची डिओ कंपनीची दुचाकीचा मालक आहे. दोघांनीही, पोलीस पथक आल्यावर गाड्या तेथेच टाकून हॉटेलच्या मागच्या दाराने पळून गेलेले आहेत.

 

या कारवाईत आरोपींकडून व घटनास्थळावरुन 5 लाख 26 हजार 824 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये 52,840 रुपये रोख रक्कम, 3 लाख 75 हजार रुपये किमतीचे 4 दुचाकी व 1 चारचाकी वाहने, 51,284 किंमतीचा विदेशी दारूचा अवैध साठा, 9,200 रुपये किंमतीचे जुगार साहित्य, 38,500 रुपये किंमतीचे 13 मोबाईल हॅन्डसेटचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Gambling Prevention Act) कलम 4 अ, 5 व 12 (अ) तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा (Maharashtra Prohibition Act) कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

जुगार चालकांची नवीन शक्कल

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नवीन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार खेळणारे व खेळवणारे हे एखाद्या कारमध्ये, रीक्षात अथवा दुचाकी वर बसून खेळी कडून मटका आकडा, सोरट व रक्कमेची देवाण घेवाण करतात. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून पसार होतात. पण आजच्या कारवाईत ज्या चारचाकी व दुचाकी वाहनांवरून घटनास्थळी मोबाईल जुगार खेळला जात होता ती वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पावसामुळे जुगार अड्डा स्थलांतरित

विशेष म्हणजे सदरचा जुगाराचा अड्डा मागील अनेक वर्षांपासून स्पायसर रोड जवळील औंध सांगवी नदी पुलाच्या अलीकडेच, सुरू होता.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, नदीकाठी पाण्याची पातळी वाढल्याने, सदरचा जुगाराचा अड्डा हा तेथेच असलेल्या दर्शन रिव्हर साईड हॉटेलमध्ये व आसपासच्या परीसरात सुरु करण्यात आला होता.
या हॉटेलमध्ये बेकायदेशीर जुगाराबरोबरच विदेशी दारूचा अवैध साठा व विक्री देखील सुरू होती.
त्यामुळे जुगार कारवाई बरोबरच दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात येऊन, विदेशी दारुचाही सर्व साठा जप्त करण्यात आलेला आहे.
हॉटेल चालकाकडे, हॉटेल चालवणेबाबत,
तसेच तेथे विदेशी मद्य साठवणे व विक्री करणेबाबत कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय परवाना आढळून आलेला नाही.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar),
महिला पोलीस हवालदार शिंदे, मोहीते, पोलीस नाईक कांबळे, बरडे, ढापसे यांच्या पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell Raids On Gambling Den

 

हे देखील वाचा :

Food For Men | आनंदी वैवाहिक जीवनासाठी पुरुषांनी खाव्यात ‘या’ 3 गोष्टी, होतील जबरदस्त फायदे

Pune News | नववे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे होणार 9 ऑगस्टला; ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना, तर ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ कवी शिवानुज यांना जाहीर

Fibroid Removed From Uterus | 38 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून निघाला भोपळ्याच्या आकाराचा 5.6 KG वजनाचा फायब्रॉइड; खराडीच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

 

Related Posts