IMPIMP

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेनेला खिंडार, बडा नेता एकनाथ शिंदे गटात सामील

by nagesh
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 40 आमदार (Shivsena MLA) फोडून शिवसेनेला मोठा भगदाड पाडले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठ धक्का दिला आहे. शिंदे यांनी पुण्यात शिवसेनेला (Pune Shivsena) खिंडार पाडले आहे. पुण्यातील नगरसेवक (Pune Corporator) नाना भानगिरे (Nana Bhangire) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. एनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. भानगिरे हे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. तसेच त्यांनी तीनवेळा हडपसर मतदारसंघातून (Hadapsar Constituency) विधानसभेची निवडणुक देखील लढवली होती. महापालिका निवडणुकीच्या (Pune PMC Election 2022) तोंडावर भानगिरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. (CM Eknath Shinde And Uddhav Thackeray)

 

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) शिवसेनेतील बडे नेते सामील होत आहेत.
यापूर्वी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare)
यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता आणि पुण्यातील बडे नाव असणारे
नाना भानगिरे हे देखील शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात नाना भानगिरे यांचे वर्चस्व आहे.
त्यामुळे त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
भानगिरे यांना आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचीच फिल्डींग लावण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक (Former Shivsena Corporator) मुंबईत दाखल झाले आहेत.
आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
भानगिरे गट शिंदे गटात सामील झाल्याने पुण्यात शिवसेनेची चिंता वाढली आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | cm eknath shinde one more setback to uddhav thackeray shivsena pune leader nana bhangire will join eknath shinde camp

 

हे देखील वाचा :

Home Remedies For Stomach Problems | पोटात जळजळ, मुरडणे, गॅस आणि ब्लोटिंगवर एकमेव अचूक उपाय; आजच अवलंबा ‘या’ वनस्पती, होतील हे फायदे

Devendra Fadnavis | अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही, फडणवीसांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

CM Eknath Shinde | शिवसेनेचे आणखी 3-4 आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?

 

Related Posts