IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन दिल्ली दौरा करणार, रुम्स देखील बुक केल्या

by nagesh
CM Eknath Shinde | chief minister shinde will go to delhi with 40 mlas

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे दिल्ली दौरे (Delhi Tour) सुरु झाले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे फक्त एकटेच जाणार नाहीत. तर ते आपल्या सोबत 40 आमदारांना (MLA) घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan) रुम्स देखील बुक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्याने राज्य सरकारची (State Government) मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्या दिल्लीत दाखल होणार असून महाराष्ट्र सदनातील बँक्वेट हॉल (Banquet Hall) आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल (Press Conference Hall) बुक करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनातील अनेक रुम बुक करण्यात आल्या आहेत. जवळपास 40 आमदार येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे हे दिल्ली दौरा (Delhi Tour) करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी 30 मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेत प्रामुख्याने वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. आता या वादानंतर शिंदे हे दिल्लीला चालले आहेत.

 

 

जयंत पाटलांचा शिंदेंना टोला

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील
(Jayant Patil) यांनी शिंदेंना टोला लगावला आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत
(Uday Samantha) हे दिल्ली जात आहेत. परंतु ते एकटे जाऊन काय उपयोग होणार.
मुख्यमंत्री गेल्याशिवाय काही मिळणार नाही आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जेवढे दिल्ली
ऐकते तेवढं मुख्यमंत्री शिंदे यांचे ऐकेल का? जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे एकत्र गेले तर हे सरकार गंभीर
आहे, असे मी समजतो. मुख्यमंत्री जर फडणवीस यांना सोबत घेऊन गेले नाही तर शिंदेंना दिल्लीत भेटही मिळणार
नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister shinde will go to delhi with 40 mlas

 

हे देखील वाचा :

Pune News | देशातील 1200 सरपंच, अधिकार्‍यांची पिंपरी-चिंचवडला राष्ट्रीय कार्यशाळा

CM Eknath Shinde | वेदांता-फॉक्सकॉन वरुन राजकारण तापलं, मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्या दिल्लीत घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

Pimpri Chinchwad Municipal Corporation | सात दिवसानंतरही पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त; स्मिता झगडे यांची नियुक्ती कोणी रोखली?

 

Related Posts