IMPIMP

CM Eknath Shinde | महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोक उपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
 CM Eknath Shinde | The government will take a positive decision on the demand for salary hike of 'Umed' employees - Chief Minister Eknath Shinde

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले (PM Narendra Modi In Mumbai) आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात विकास किती झाला हे आपल्याला माहित आहे. आता ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील लोक उपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, त्यातून या राज्याची सुटका करण्याची संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली. मी जेव्हा नरेंद्र मोदी यांना भेटतो तेव्हा मला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच येत्या दोन ते अडीच वर्षात मुंबईचा कायापालट झाला असेल. असा विश्वास देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाले होते. आणि त्याच प्रकल्पाचे लोकार्पण पुन्हा त्यांच्याच हस्ते होत आहे. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. काही लोकांची अपेक्षा होती की हे कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नयेत. पण तसे झाले नाही. आणि जे काही घडत आहे ती आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा होती. असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. गेल्या महिन्यात समृध्दी महामार्गाचे लोकार्पण झाले, आणि आता मेट्रोचे. समृध्दी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जोडलं गेलं. आणि आता मेट्रोच्या रूपाने आमचं हे दुसरं स्वप्न साकार झालं आहे. असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

मुंबईत विविध विकास योजनांचे लोकार्पण व भूमीपूजन होत आहे.
त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.
नरेंद्र मोदी हे देशातच नाहीत तर जगभर देखील खूप लोकप्रिय आहेत.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच काम करणार आहोत.
या सरकारने, शेतकऱ्यांना मदत केली, गोरगरिबांना मदत केली, पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले.
विविध निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या पोटात मळमळ होते आहे, छातीत धडधड होते आहे.
सहा महिन्यात या सरकारने एवढं केलं तर पुढच्या दोन वर्षात काय करतील? या अस्वस्थेतूनच ही टीका होते आहे.
असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde slams mva and uddhav thackeray in front of pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Namita Thapar | सर्रास होणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दल नमिता थापर हिने केले मोठे वक्तव्य; म्हणाली – ‘मला बऱ्याचदा मिशी असलेली……’

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…

 

Related Posts