IMPIMP

CM Eknath Shinde Threat Call | ‘मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ! पुण्यातून धमकीचा कॉल, मुंबईतील एकजण अटकेत

by nagesh
CM Eknath Shinde Threat Call | cm eknath shinde get life threat from pune police arrest accused pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे, असा धमकीचा फोन आल्यानंतर पुण्यात प्रचंड खळबळ
उडाली (CM Eknath Shinde Threat Call). सोमवारी रात्री आरोपीने 112 या हेल्पलाईनवर कॉल करून धमकी दिली. मी एकनाथ शिंदे (CM
Eknath Shinde) यांना उडवणार आहे असे म्हणून त्यांनं फोन बंद केला. पोलिसांना (Pune Police) युध्दपातळीवर तपास करून आरोपीला ताब्यात
घेतलं आहे. राजेश मारूती आगवने Rajesh Maruti Agawane (43) असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील धारावी (Dharavi Mumbai) परिसरात
राहतो. (CM Eknath Shinde Threat Call)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार असल्याचे फोनवर सांगण्यात आले. पोलिसांनी युध्दपातळीवर तांत्रिक तपासास सुरूवात केली. धमकीचा कॉल पुणे शहरातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी राजेश आगवनेला तात्काळ ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. (CM Eknath Shinde Threat Call)

 

छातीत दुखत असल्याने सोमवारी रात्री 12 वाजता राजेशने सर्वप्रथम 112 वर कॉल करून रूग्णवाहिका पाठवा असे कळविले. त्यासाठी नियंत्रण कक्षातून त्याला 108 ला कळवा असे सांगण्यात आले. त्याने दुसर्‍यावेळी त्याच क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

 

राजेश मारूती आगवने हा वॉर्डबॉय म्हणून काम करत असून तो मुंबईच्या धारावी परिसरात रहायावस आहे. त्याची पत्नी पुण्यातील कोथरूड परिसरात एका खासगी ठिकाणी काम करते. तिला भेटण्याकरिता तो महिन्यातून 2 वेळा येतो. सोमवारी पत्नीला भेटण्यासाठी आल्यावर त्याच्या छातीत दुखत होते.
त्यावेळी त्याने 112 वर कॉल करून रूग्णवाहिका पाठवा असे सांगितले होते. त्याला 108 वर कळवा असे सांगितल्यानंतर देखील त्याने परत 112 वर कॉल करून धमकी दिल्याचे समोर आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde Threat Call | cm eknath shinde get life threat from pune police arrest accused pune crime news

 

हे देखील वाचा :

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

Bengaluru Smashers – Punit Balan | अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत आता बंगळूर स्मॅशर्स नवा संघ; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे संघाची मालकी

 

Related Posts