IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघेजण सापडले तर तिसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु

by nagesh
CM Eknath Shinde | three duplicates of chief minister eknath shinde two found search for third underway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  CM Eknath Shinde | या जगात प्रत्येक व्यक्तीचा एकतरी हमशकल असतो. तो हूबेहूब त्या व्यक्तीसारखा दिसत असतो. काही दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासारखे दिसणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्याचे एक नाही तर तीन डुप्लिकेट (Duplicate) आहेत. या तीन पैकी विजय माने (Vijay Mane) व भीमराव माने (Bhiamrao Mane) यांची ओळख पटली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे रिक्षाचालक होते. त्यामुळे पिंपरी- चिंचवडमधील रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे (Baba Kamble) यांचा तरुणपणाचा फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो म्हणून व्हायरल झाला होता. त्यानंतर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून फिरतो. नुकताच त्याचा व सराईत गुन्हेगार शरद मोहोळसोबत (Sharad Mohol) सीएम वेशभूषेतील फोटो व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare) व उपनिरीक्षक मोहनदास जाधव (Sub-Inspector Mohandas Jadhav) यांनी या फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

 

तसेच सांगली (Sangli) येथील जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने स्पर्धा आयोजित केली होती.
यावेळी त्याठिकाणी तमाशा देखील ठेवण्यात आला होता.
त्या तमाशात सांगलीत दुसरा डुप्लिकेट मुख्यमंत्री (Duplicate CM) म्हणून भीमराव माने याने मुख्यमंत्री शिंदे
यांच्यासारखी वेशभूषा केली होती. तो या कर्यक्रमात नाचतसुद्धा होता.
त्याच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | three duplicates of chief minister eknath shinde two found search for third underway

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वीज कट केल्याने महावितरणच्या अधिकार्‍याला बेदम मारहाण, केले फ्रॅक्चर

Viral Video News | हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडून पत्नीकडून पतीला मारहाण

Bharti Jaffrey Passed Away | अभिनेते अशोक कुमार यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन

 

Related Posts