IMPIMP

Cops Suspended In Pune | पुण्यातील 2 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

by sachinsitapure
Police Suspended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Cops Suspended In Pune | पुणे शहरातील सायबर पोलिस ठाण्यातील (Cyber Police Station) दोन पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांनी काढले आहेत. (Pune Police News)

पोलिस अंमलदार निखील अरविंद पासलकर आणि पोलिस अंमलदार पोपट काळुसिंग खाडे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हयामध्ये पोलिसांनी मार्शल लुईस लीलाकर (24, रा. भाऊ पाटील चाळ, आकुर्डी, पुणे) याला दि. 9 फेबु्रवारी 2024 रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला दि. 13 फेबु्रवारी 2024 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

पोलिसांनी त्याला विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. दि. 11 फेब्रुवारी रोजी आरोपी मार्शल लीलाकर याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी सुरू असताना त्याच्यावर देखरेख ठेवण्याच्या जबाबदारी पोलिस अंमलदार निखील अरविंद पासलकर आणि पोलिस अंमलदार पोपट काळुसिंग खाडे यांच्यावर होती. दरम्यान, आरोपी लीलाकरने पोलिसांची नजर चुकवून तेथून पळ काढला. त्यामुळे पासलकर आणि खाडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी काढले आहेत.

Related Posts