IMPIMP

Pune Nirbhay Bano Sabha Rada | पत्रकार निखील वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणाची वस्तुस्थिती तपासून 307 चा गुन्हा दाखल करणार पोलीस आयुक्तांची ग्वाही

by sachinsitapure
Rahul Dambale

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Nirbhay Bano Sabha Rada | निखिल वागळे हल्ला प्रकरणी (Attack On Nikhil Wagle) संपूर्ण वस्तुस्थितीचे अवलोकन करून गरज वाटल्यास 307 चा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच आंदोलन करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये , विशेषता आंदोलनाच्या नावाखाली होणारे शारीरिक हल्ले सहन केले जाणार नाहीत अशी ग्वाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी रिपब्लिकन युवा मोर्चा , शिवसेना , काँग्रेस व पुरोगामी पक्ष संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळात दिले.

9 फेब्रुवारी रोजी निर्भय बनो सभेसाठी आलेले निखिल वागळे, असीम सरोदे , विश्वंभर चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींकडून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी . हल्ल्यातील सहभागींवर खुणाचा प्रयत्न करणे , कट कारस्थान करणे व शासकीय कामात अडथळा आणणे इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटकेची कारवाई करावी. असीम सरोदे , विश्वंभर चौधरी व निखिल वागळे यांना योग्य पोलीस संरक्षण द्यावे या प्रमुख मागण्या आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे , शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष राहुल डंबाळे (Rahul Dambale), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वसंत पवार, काँग्रेस पक्षाचे मिलिंद आहिरे , यांच्यासह रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डंबाळे , दलित पॅंथरच्या स्नेहा माने, राहुल ससाने , सोनिया ओवाळ , प्रवीण डोंगरे , प्रतिक डंबाळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळेस सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार , अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील , पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील , पोलिस उपायुक्त संभाजी कदम व इतर अधिकारी उपस्थित होते.

सुमारे एक तास झालेल्या शिष्टमंडळा समवेत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून याची गंभीर दखल राज्य सरकार व पुणे पोलीस आयुक्त म्हणून मी स्वतः घेतली आहे असे सांगितले. आंदोलनाच्या नावाखाली मालमत्तेचे नुकसान करणे , विशेषतः शारीरिक हमले करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. अशा प्रकारची चुकीची कामे करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, यंदाच्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूक असल्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाचा कोणताही पायंडा पडू नये म्हणून पुणे शहरातील सर्व प्रमुख पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधी समवेत एकत्रित बसून आंदोलनाची आचारसंहिता सुनिश्चित करण्यात येईल व याबाबतची बैठक लवकरच घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी उदय सामंत यांच्यासमोर केलेल्या आंदोलनाच्या आधार घेऊन त्यावेळी आंदोलकांवर विनाकारण जीवे ठार मारणे विषयी कलमे लावली गेली होती, परंतु इथे त्यापेक्षा भयान परिस्थिती असताना सुद्धा किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून पोलीस असमानतेची वागणूक देत असल्याकडे लक्ष वेधले. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी मागील गुन्ह्यांची परिस्थिती तपासून घेऊ , मात्र आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत असे सांगितले.

पुणे शहरातील सामाजिक चळवळींना पोलिसांचे संरक्षण आवश्यक असून उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून सातत्याने त्यांच्यावर हल्ले केली जात आहेत ते रोखणे आवश्यक असल्याचे मत राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.

कालच भाजप आमदार नितेश राणे यांनी निखिल वागळे यांच्या हल्ल्याच्या अनुषंगाने अत्यंत गंभीर व चितावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणाचा विषय समोर मांडल्यानंतर या वक्तव्याची देखील तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Related Posts