IMPIMP

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन

by nagesh
Corporator Dhiraj Ghate | Increase in rent of employees living in slums, should be reconsidered by the municipality; Corporator Dheeraj Ghat's statement to the Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) कर्मचाऱ्यांच्या (PMC Employees) चाळींमधे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) नुसार बेसुमार वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने घरभाडे वाढले त्या दर्जाची घरे व सुविधा महापालिका कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देते का या गोष्टींचा विचार करावा. या संदर्भात आज पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना नगरसेवक धीरज घाटे (Corporator Dhiraj Ghate) यांनी निवेदन दिले. यामध्ये महापालिकेने पुनर्विचार करावा असे नगरसेवक धीरज घाटे (Corporator Dhiraj Ghate) म्हंटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol), उपमहापौर सुनिता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar), स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) उपस्थित होते. भविष्यात या विषयात सर्वतोपरी कायदेशीर प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता जनता पार्टी (BJP) कटिबद्ध असल्याचे नगरसेवक धीरज घाटे (Corporator Dhiraj Ghate) यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले की, 2013-14 च्या ऑडीट रिपोर्टनुसार पुणे मनपातील सेवकांच्या घर भाड्यात तडकाफडकी वाढ करण्यात आली व आता सातव्या वेतन आयोगामुळे प्रचंड प्रमाणात घरभाडे वाढ (House Rent Increase) झालीआहे. ही बाब अन्यायकारक आहे. पुणे मनपा वसाहतींचे बांधकाम होऊन 40 ते 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. येथील खूप इमारती ह्या मोडकळीस आलेल्या आहेत. वसाहतीमध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. काही इमारती ह्या धोकादायक आहेत. मागील वर्षी पुणे मनपातील चाळ विभागाकडील अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करुन या इमारती धोकादायक जीर्ण झालेल्या, मोडकीस झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असा अहवाल सादर केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तरी या सेवकांचा सहानुभूतीने विचार करुन आयुक्तांनी प्रत्यक्षात इमारतींची पाहणी करुन घरांची स्थिती पाहावी व त्या प्रमाणात घरभाडे आकारले जावे,
अशी मागणी नगरसेवक धीरज घाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

 

Web Title :- Corporator Dhiraj Ghate | Increase in rent of employees living in slums, should be reconsidered by the municipality; Corporator Dheeraj Ghat’s statement to the Commissioner

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी असी घ्यावी डोळ्यांची काळजी

 

Related Posts