IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona | 149 Corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉनचे रुग्ण वढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 149 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 271 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 149 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 572 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. (Pimpri Corona)

 

शहरामध्ये सध्या 484 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 241 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 243 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pimpri Corona | 149 Corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी असी घ्यावी डोळ्यांची काळजी

Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | तरुणी गर्भवती राहिल्यावर तरुणाचा लग्नाला नकार, पुण्यात तरुणाविरुद्ध FIR

 

Related Posts