IMPIMP

Crime News | BJP आमदाराच्या सुनेचा धक्कादायक आरोप; ‘माझा सेक्स स्लेव्ह म्हणून केला वापर’

by nagesh
Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

भोपाळ : वृत्तसंस्था Crime News | मध्य प्रदेश राज्यातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना (Crime News) समोर आली आहे. तेथील एका भाजप आमदाराच्या (BJP MLA) सुनेने धक्कादायक आरोप केलेत. ‘माझा सेक्स स्लेव्ह म्हणून वापर केला असल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. लग्नाच्या 6 महिन्यात मी जिवंत मृतदेहाप्रमाणे जगत असल्याचंही तिने सांगितलं आहे. हे धक्कादायक आरोप मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील भाजप आमदार जालम सिंह पटेल (BJP MLA Jalam Singh Patel) यांच्या मुलाची पत्नी नीतू सिंग (Neetu Singh) हिने केले आहेत. या धक्कादायक आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, 2016 साली नीतूला भाजप आमदार जालम सिंह पटेल (BJP MLA Jalam Singh Patel) यांच्या मुलासाठी विचारणा झाली होती. तेव्हा तिचं वय 26 वर्षे होतं. दरम्यान नीतूने सांगितले की, लग्न ठरेपर्यंत कोणालाच सांगू नये अशी जबरदस्ती तिच्यावर केली गेली होती. राजकारणात हे करावं लागतं असंच तिला सतत सांगितलं जात होतं. सुरुवातीला मुलांवर कोणतेही कायदेशीर गुन्हे दाखल नसल्याचं सांगितले. पण, लग्नानंतर समजलं की, हत्या, हत्येचा प्रयत्न याअंतर्गत त्याच्यावर 45 गुन्हे दाखल आहेत. शिक्षणाबद्दलही त्यांनी खोटी माहिती दिली होती. (Crime News)

 

 

नीतूने सांगितलं, लग्नाच्या आधी त्यांनी शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली होती. नकार दिल्यामुळे तो राग कायम त्यांच्या मनात होता. लग्नानंतर माझा मोबाइल नंबर बदलला. माझं घरातून बाहेर जाणं बंद केलं. याशिवाय मी फोनवर कोणाशी बोलते हेही तपासलं जात होतं. आणि मला अनेक सवाल विचारले जात होते. तसेच आमदाराच्या मुलाचे बाहेर अनैतिक संबंध होते. मुलगा रोज बाहेर गर्लफ्रेंडसोबत फिरत असे आणि घरी येऊन पत्नीवर जबरदस्ती करीत होता. तसेच पत्नीवर नियमित मारहाण करणे, तिला स्वातंत्र्य न देणे, तिच्याकडे वारंंवार लक्ष ठेवणे, कधी कधी तर गळा दाबत होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, या दिवसात तिची प्रकृती बिघडली होती. याबाबत तिने माहेरच्यांनाही अनेक वेळा सांगितलं.
पण त्यांनीही काही दिवसात हे सर्व ठीक होईल असं म्हटलं.
याबाबत तिने आमदार सासऱ्यांना अनेकदा सांगितलं. पण ते या प्रकरणात सर्व ठीक होईल, असंच सांगितलं.
त्याचबरोबर त्यांचं सरकारी आमदार निवास हे ड्रग्स आणि दारूचा अड्डा असल्याचाही आरोप तिने केलाय.
याबाबत तिच्याकडे पुरावा असल्याचे तिने सांगितले.
तसेच, आता मी दिल्लीत (Delhi) राहून नोकरी करते आणि न्यायालयात घटस्फोटासाठी (Divorce) लढत असल्याचं तिने सांगितलं आहे.

 

Web Title :- Crime News | allegation of bjp mlas daughter in law

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3 % घटस्फोट ! अमृता फडणवीस महिलांच्या प्रायव्हसीवर बोलल्या; म्हणाल्या – ‘माझे मानसिक संतुलन ढासळलेले नाहीय’

Multibagger Stock | Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ मल्टीबॅगर शेयरमध्ये लागले अपर सर्किट, एक महिन्यात 95% वाढली किंमत

LIC Initial Public Offering (LIC IPO) | पॉलिसी धारकांसाठी महत्वाची माहिती ! IPO हवाय मग तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या

 

Related Posts