IMPIMP

LIC Initial Public Offering (LIC IPO) | पॉलिसी धारकांसाठी महत्वाची माहिती ! IPO हवाय मग तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या

by nagesh
EPFO Facility | epfo facility employee provident fund organization

सरकारसत्ता ऑनलाइन – LIC Initial Public Offering (LIC IPO) | भारताची सर्वात मोठी कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) आहे. दरम्यान, एलआयसीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग LIC Initial Public Offering (LIC IPO) लवकरच येणार आहे. दरम्यान याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एलआयसी (LIC Policy) आगामी आठवड्यामध्ये बाजार नियामक SEBI कडे आयपीओ साठी कागदपत्रांचा मसुदा देऊ शकणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सेबीच्या मंजुरीनंतर कंपनीचा IPO मार्च महिन्यात येणे अपेक्षित आहे. दरम्यान, एलआयसीच्या पॉलिसीधारकांना एलआयसी IPO मधून कमाई करण्याची चांगली संधी उपलब्ध असणार आहे. या अनुषंगाने तुमच्या एलआयसी पॉलिसी खात्याशी पॅन जोडलेले असणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे डीमॅट खाते (Demat Account) असणे आवश्यक आहे. दरम्यान, एलआयसी आयपीओ मध्ये इश्यू साईजच्या 10 टक्के पॉलिसी धारकांसाठी राखीव असणार आहे. तसेच, एलआयसीची पॉलिसी असेल, तर त्याच्या आयपीओ मध्ये तुमच्यासाठी राखीव कोटा असणार आहे. LIC Initial Public Offering (LIC IPO)

 

तुम्ही पॅन आणि डीमॅट खाते (PAN And Demat Account) अपडेट केले असल्यासच तुम्ही या मेगा IPO मध्ये सहभागी होऊ शकता. तसेच, एलआयसीच्या आयपीओची क्रेझही मोठी असून अनेकजण आयपीओसाठी एलआयसीची पॉलिसी खरेदी करत असल्याचे कळते. तसेच, एलआयसीची आयपीओ कधी येणार आणि त्यात पैसे गुंतवून कधी संपत्ती मिळवणार याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

पेटीएम सारख्या कंपनीचा आयपीओ फुसका बार निघाल्यानंतर एलआयसीचा आयपीओ ही गुंतवणूकदारांना खुणावत आहे. परंतु, केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी निर्गुंतवणुकीबाबतची मोठी माहिती पुढे आलीय. सरकारने अर्थसंकल्पामध्ये निर्गुंतवणुकीचे लक्ष्य निम्म्यापेक्षा कमी केलंय. आता 2022-23 मध्ये निर्गुंतवणुकीचं लक्ष्य 1.75 लाख कोटींवरुन थेट 78 लाख कोटी रुपये इतकं केलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, सरकार संपूर्ण एलआयसी कंपनीपैकी फक्त 5 टक्के समभागाची विक्रीचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे.
सरकारचा या मोबदल्यात 65 हजार ते 75 हजार कोटी रुपये जमा करण्याचा हेतू आहे.
अशी माहिती ईटी नाऊ’च्या एका रिपोर्टनुसार समोर आलीय, त्याचबरोबर एलआयसीचा आयपीओ 80 हजार ते 1 लाख कोटी रुपयांपर्यंतचा असू शकतो.
सरकारनं या IPO द्वारे LIC ची 10 टक्के भागीदारी विकण्याची तयारी केली होती.
मागील अर्थसंकल्पात याच IPO ला समोर ठेवून 1.75 लाख कोटी रुपये निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र त्यामध्ये निम्म्याहून घट केली गेली.

 

आयपीओ साठी पॅन लिंक करण्यासाठी –

https://licindia.in/ वर जावं लागेल.

– यानंतर ऑनलाईन पॅन रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा.

– ऑनलाइन पेजवर क्लिक करा.

– पेजवर प्रोसिडचं बटनवर क्लिक करा.

– तुमचा Email, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबरची माहिती भरा.

– बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका.

– तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरुन सबमिट करा.

– तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LIC Initial Public Offering (LIC IPO) | lic policy if you want an ipo need demat account pan link

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, न्यायालयाचा निर्णय

Police Inspector Missing | पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून ACB चे पोलीस निरीक्षक (PI) बेपत्ता, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Anil Deshmukh-Anil Parab | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठका?

 

Related Posts