IMPIMP

Multibagger Stock | Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ मल्टीबॅगर शेयरमध्ये लागले अपर सर्किट, एक महिन्यात 95% वाढली किंमत

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned shares fall after his death aptech star health major losers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stock | डीबी रियल्टी लिमिटेडच्या शेयरमध्ये (DB Realty Share Price) गुरुवारी अपर सर्किट लागले आणि बीएसईवर 5 टक्क्यांच्या वाढीसह तो 96.10 रुपयांवर बंद झाला. हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) गेल्या एका महिन्यात 95 टक्क्यांनी वाढला आहे आणि गेल्या 6 महिन्यांत तो 256 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. एक वर्षापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये, हा स्टॉक 18 रुपयांवर ट्रेडिंग करत होता आणि आज तो 403 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 96 रुपयांवर व्यवहार करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

शेअर इंडिया सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट आणि रिसर्च हेड रवी सिंग म्हणाले, DB Realty स्टॉकचे व्हॉल्यूम कमी आहे. त्याचे फंडामेंटल सुद्धा कमजोर आहे, जे किंमतीत आलेल्या तेजीचे समर्थन करत नाही.

 

मात्र, टेक्निकल सेटअपवर पाहिल्यास, हा रियल्टी स्टॉक त्याच गतीने आणि अस्थिरतेसह रु. 100 च्या पातळीला स्पर्श करू शकतो. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि संधीचा वापर ते प्रॉफिट बुकिंगसाठी करू शकतात.

 

गोदरेज प्रॉपर्टीजने (Godrej Properties) गुरुवारी सांगितले की, ते कन्व्हर्टेबल वॉरंटच्या स्वरूपात डीबी रियल्टीमध्ये संभाव्य गुंतवणुकीचे मूल्यांकन करत आहेत. गोदरेज प्रॉपर्टीजची डीबी रियल्टीसोबत मिळून एक जॉईंट व्हेंचर करण्याची योजना आहे, जी झोपडपट्टी पुनर्वसन आणि MHADA च्या पुनर्विकास योजना पाहिल. (Multibagger Stock)

मुंबईत मुख्यालय असलेल्या डीबी रियल्टीने गेल्या महिन्यात स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, ते प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांना वॉरंट जारी करून 563 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावावर शेयरधारकांची मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डीबी रियल्टीमध्ये शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचीही गुंतवणूक आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार डीबी रियल्टीचे 2.06% भागीदारी आहे.

 

Swastika Investmart Ltd चे रिसर्च हेड संतोष मीना म्हणाले, डीबी रियल्टी शेअर्समधील वाढ या आधारावर होत आहे.
की, कंपनी निधी उभारणीच्या योजनांवर विचार करत आहे. रिअ‍ॅल्टी सेक्टरवर सध्या ओव्हर ऑल लुक बुलिश आहे.
मात्र, अलिकडच्या काळात डीबी रियल्टीच्या आर्थिक स्थितीत आणि मूल्यांकनात झालेली प्रचंड वाढ ही अशी बाजू आहे जी चिंता वाढवणारी आहे.
म्हणून मी या सेक्टरमध्ये शोभा, प्रेस्टीज, ओबेरॉय रियल्टी यांच्यासोबत राहीन.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Multibagger Stock | rakesh jhunjhunwala porftolio multibagger realty stock hits upper circuit surges 95 percent in a month

 

हे देखील वाचा :

LIC Initial Public Offering (LIC IPO) | पॉलिसी धारकांसाठी महत्वाची माहिती ! IPO हवाय मग तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या

Nitesh Rane | नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, न्यायालयाचा निर्णय

Police Inspector Missing | पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून ACB चे पोलीस निरीक्षक (PI) बेपत्ता, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Anil Deshmukh-Anil Parab | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठका?

 

Related Posts