IMPIMP

Criminal Lawyer Shrikant Shivade | ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे पुण्यात 67 व्या वर्षी निधन; बॉलीवूडमधील कलावंतांचे वकील म्हणून होते प्रसिद्ध

by nagesh
Criminal Lawyer Shrikant Shivade | Noted criminal lawyer Shrikant Shivade dies at 67

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Criminal Lawyer Shrikant Shivade | ज्येष्ठ विधीज्ञ आणि बॉलीवूडमधील कलावंताचे वकील म्हणून प्रसिद्ध असणारे अ‍ॅड. श्रीकांत शिवदे (वय 67) Criminal Lawyer Shrikant Shivade यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यात निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने (Cancer) आजारी होती. आज सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वकिलांमध्ये उत्तम स्रेही, अत्यंत अभ्यासु मनमिळावू आणि मैत्रीला जागणारा म्हणून ते वकिलवर्गात लोकप्रिय होते. प्रदीर्घ काळ जीवघेण्या आजाराशी झुंजत असतानाही त्यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) व्हीसीद्वारे युक्तीवाद केला होता. श्रीकांत शिवदे (Criminal Lawyer Shrikant Shivade) हे फौजदारी कामकाजात एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. साक्षीदाराची उलट तपासणी घेणारे प्रख्यात वकील म्हणून ते ओळखले जात.

 

 

ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली वकिली सुरु केली होती. खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (Adv Harshad Nimbalkar), अ‍ॅड. विराज काकडे यांच्यासमवेत यांनी एकत्रित काम केले. मोहिते चेंबरचे वकील म्हणून ते ओळखले जात. श्रीकांत शिवदे यांनी कायम फौजदारी केसेस चालविल्या. सलमान खान (Salman Khan) याच्या बांद्रा (Bandra) येथील हिट अँड रन (Hit And Run Case) खटल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. या खटल्यात अ‍ॅड. शिवदे यांनी पुण्यातील केपीआयटी टेक्नॉलॉजी तसेच यातील लँड क्लुझर कंपनीचा गाडीविषयाचा पुरावा सादर करुन सलमान खानची बाजू भक्कम
केली होती.

 

 

प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि बॉलीवूडमधील चित्रपटांचे फायनान्सर भरत शहा (Bharat Shah)
यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला (Underworld Don Chhota Shakeel) मदत केल्याच्या खटल्यात शहा यांचे काम
अ‍ॅड. शिवदे यांनी पाहिले होते. भारतातील हा पहिला खटला होता, ज्यात पुरावा म्हणून कॉल रेकॉर्ड सादर करण्यात आले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांच्यावरील बलात्काराच्या खटल्यात (Rape Case) त्यांनी काम पाहिले होते.
मालेगाव बॉम्बब्लास्टमधील (Malegaon Bomb Blast Case) लेफ्टनंट प्रसाद पुरोहित (Lieutenant Colonel Prasad Purohit) यांचे ते वकील होते.

 

 

Web Title :- Criminal Lawyer Shrikant Shivade | Noted criminal lawyer Shrikant Shivade dies at 67

 

हे देखील वाचा :

Mumbai Local Mega Block | मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक; 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम

Mulgi Zali Ho | ‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण मानेंच्या जागी ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकरणार माऊच्या वडिलांची भूमिका

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम

 

Related Posts