IMPIMP

CSK Team Update | IPL सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

by nagesh
CSK Team Update | sisanda magala will play for chennai super kings in ipl 2023 kyle jamieson ruled out because of back injury

सरकारसत्ता ऑनलाईन – CSK Team Update | 31 मार्च 2023 पासून पुरुषांच्या आयपीएलला (Men’s IPL) सुरुवात होणार आहे. हे सामने सुरु होण्याच्या अगोदर चेन्नईच्या (CSK) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा (New Zeland) अष्टपैलू खेळाडू कायली जेमिसन (Kylie Jameson) पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला आहे. यामुळे चेन्नईच्या संघाला (CSK Team Update) मोठा धक्का बसला आहे. यानंतर कायली जेमिसनच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज सिसांडा मेगाला (Sisanda Magala) याला संधी देण्यात आली आहे. मेगालाने आपल्या संपूर्ण टी- 20 क्रिकेटच्या कारकिर्दीत 136 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने भल्याभल्यांच्या दांड्या गुल केल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नुकत्याच पार पडलेल्या SA20 लिगमध्ये मेगला चॅम्पियन खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. त्याला चेन्नईच्या संघाने 50 लाखांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात सामावून घेतले आहे. तर कायल जेमिसनला सीएसकेने 1 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. कायल जेमिसन चेन्नईच्या संघात सामील होण्याच्या अगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत होता. कायल जेमिसनच्या जागी सिसांडा मेगालाची वर्णी लागल्याचे सीएसकेनं त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरून जाहीर केले आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.

 

या वर्षी प्रथमच महिलांची आयपीएल सुरु करण्यात आली आहे. या आयपीएला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे.
पुरुषांप्रमाणेच महिला आयपीएलदेखील मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.
या आयपीएलमध्ये मुबई, गुजरात, बंगलोर, दिल्ली, आणि युपी हे 5 संघ खेळत आहेत.
या टूर्नामेंटची सांगता 26 मार्च रोजी होणार आहे. यंदाची पहिली महिला आयपीएल ट्रॉफी कोणती टीम जिंकते
याकडे सर्वांचे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : CSK Team Update | sisanda magala will play for chennai super kings in ipl 2023 kyle jamieson ruled out because of back injury

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

Chandrakant Patil | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता -चंद्रकांत पाटील

 

Related Posts