IMPIMP

Chandrakant Patil | सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

by nagesh
Chandrakant Patil | Approval of Finance Department to fill the posts of Assistant Professor, Principal, Director of Physical Education, Librarian

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Chandrakant Patil | विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत
परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे
भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेत (Vidhansabha) निवेदनाद्वारे
दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्री पाटील म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल – १२१ आणि
शारीरिक शिक्षण संचालक – १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत
वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून
त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेत सांगितले.

 

 

Web Title : Chandrakant Patil | Approval of Finance Department to fill the posts of Assistant Professor, Principal, Director of Physical Education, Librarian

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता -चंद्रकांत पाटील

Attack On Police Officer | जुगार अड्डयावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जुगार्‍यांचा हल्ला, 5 पोलिस जखमी

Eknath Khadse | ‘सध्या विरोधकांना शत्रूसारखं वागवलं जातं’, एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

 

Related Posts