IMPIMP

Cyclone Asani | असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता

by nagesh
Cyclone Asani | cyclone asani change route live updates see what effects on maharahstra imd alert

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनपश्चिम बंगालच्या (West Bengal) खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ (Cyclone Asani) निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला (Route Change) असून आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) दिशेने वाटचाल केली आहे. त्यामुळे हवामान खात्याने (IMD) आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी (East Godavari), पश्चिम गोदावरी (West Godavari) आणि यनम (Yanam) या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. दरम्यान असनी चक्रीवादळाचा (Cyclone Asani) परिणाम महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांवर जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

असनी चक्रीवादळ (Cyclone Asani) हे काकीनाडा (Kakinada) आणि विशाखापट्टनमच्या (Visakhapatnam) किनारपट्टीच्या (Coast) भागात धडकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दरम्यान वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. या काळात मुसळधार (Heavy) ते अतिमुसळधार पाऊस (Very Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 12 मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

 

 

चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रभाव
असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांवर होणार आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागाचा समावेश आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मुंबई (Mumbai), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्यातील 11 आणि 12 मे रोजीचा हवामान अंदाज

11 मे
मराठवाडा/कोकण – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

 

12 मे
कोकण – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र/ मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता
विदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता

 

Web Title :- Cyclone Asani | cyclone asani change route live updates see what effects on maharahstra imd alert

 

हे देखील वाचा :

Black Pepper For Weight Loss | फॅटपासून मुक्ती देण्यासाठी उपयोगी आहे काळी मिरी, वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा वापर

Chhatrapati Sambhaji Raje | तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यामध्ये छत्रपतींच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

Janhvi Kapoor Late Night Party Photos | रात्री उशिरा पार्टीत मुलासोबत दिसली जान्हवी कपूर, बॅकलेस ड्रेस घालून केले असे कृत्य..

 

Related Posts