IMPIMP

DA Hike-DR Hike | 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचे चित्र स्पष्ट, जाणून घ्या 20 हजार बेसिकवर किती होईल फायदा

by nagesh
DA-DR Hike | da hike dr hike central government employees pensioner salary hike house rent allowance 7th pay commission news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था DA Hike-DR Hike | New Year 2022 चे आगमन होताच महागाई भत्ता (Dearness allowance) वाढण्याची शक्यता वाढली आहे. याचा थेट फायदा देशातील कोट्यवधी केंद्रीय (Central Government Employees) आणि राज्य कर्मचार्‍यांना होणार आहे. त्यांना पगारात बंपर वाढ (Salary Hike) मिळणार आहे. महागाई भत्त्यात ही वाढ जुलै ते डिसेंबर 2021 पर्यंत असेल. त्याची घोषणा नंतर होणार असली तरी पगारवाढीची बातमी नवीन वर्षात दुहेरी आनंद देणारी आहे. (DA Hike-DR Hike)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कामगार मंत्रालयाने नोव्हेंबर 2021 साठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाचे (AICPI-IW) आकडे जारी केले आहेत. यामध्ये आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत 0.8 टक्क्यांनी वाढ केली आहे. नोव्हेंबरमध्ये AICPI-IW 125.7 वर आला आहे. तर ऑक्टोबर 2021 मध्ये तो 124.9 वर होता. आता, महागाई भत्त्यावर याचा किती परिणाम होईल ते जाणून घेवूयात. (7th Pay Commission)

 

DA तज्ञ हरिशंकर तिवारी यांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या तुलनेत निर्देशांकात वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये CPI-IW चांगला वाढला. सध्याच्या आकडेवारीच्या आधारे असे म्हणता येईल की जानेवारीमध्ये डीएमध्ये 3 टक्के वाढ शक्य आहे. (DA Hike-DR Hike)

 

हरिशंकर तिवारी म्हणाले की, जर सीपीआय-आयडब्ल्यू नोव्हेंबरमध्ये घसरला असता तर डीए 3 टक्क्यांनी वाढला नसता. सरकारी कर्मचार्‍यांना सध्या डीए 28 टक्के आहे. डीएमध्ये शेवटची वाढ जुलै 2021 मध्ये झाली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3 टक्के वाढीवर DA ची गणना

– जर मूळ वेतन 20,000 रुपये असेल

– यामध्ये 31 टक्के डीए जोडला जाईल – 6200 रुपये

– HRA – रु 5400 (किमान)

– प्रवास भत्ता वगळता 1 महिन्यात एकूण पगार 31600 रुपये असेल

 

AICPI चे आकडे
– महिना CPI-01 CPI-16

– जुलै 2021 353.66 122.8

– ऑगस्ट 2021 354.24 123.0

– सप्टेंबर 2021 355.10 123.3

– ऑक्टोबर 2021 359.71 124.9

– नोव्हेंबर 2021 — 125.7

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कसे घेतले आकडे
कामगार मंत्रालय (labour minister of india) देशातील 88 औद्योगिक केंद्रांमधील 317 बाजारांमधून किरकोळ किमती काढते. या आधारावर दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांक तयार केला जातो.

 

 

Web Title :- DA-DR Hike | da hike dr hike central government employees pensioner salary hike house rent allowance 7th pay commission news

 

हे देखील वाचा :

Aadhaar-PAN Card Center on Railways Station | रेल्वे स्टेशनवर सुद्धा बनवू शकता Aadhaar आणि PAN Card, सुरू झाली ‘ही’ सर्व्हिस

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक ! आरोग्य कर्मचारी ‘गोत्यात’; बारामती पोलिसांची कारवाई

7th Pay Commission | ‘इथं’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 23.39% वाढ, बरोबर सेवानिवृत्तीच्या वयातही वाढ

 

Related Posts