IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक ! आरोग्य कर्मचारी ‘गोत्यात’; बारामती पोलिसांची कारवाई

by nagesh
Pune Crime | Inter-state gang arrested by Chathushringi police; 9 crimes revealed, compensation of 5 lakh 74 thousand seized

पुणे/बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | लग्नाच्या संकेतस्थळावरुन (Wedding Website) मुलींना लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील बारामती तालुका पोलिसांनी (Baramati taluka police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मला आई-वडील नाहीत, मी एकटात आहे. मला सरकारी नोकरी असून अविवाहित असल्याची बतावणी करुन मुलींची फसवणूक (Cheating) करत होता. तसेच मुलींना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करुन पैसे उकळत (Pune Crime)  होता. पैसे मिळाल्यानंतर तो पळून जात होता. आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी (दि.6) भोर (Bhor) येथून अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजयकुमार नंदकुमार चटौला Ajaykumar Nandkumar Chataula (रा. रुई रुग्णालय शासकीय वसाहत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक
(Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई येथील एका 39 वर्षीय पीडित महिलेने, लग्न संकेतस्थळावरुन आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून
बलात्कार (Rape) करुन पैसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार मुंबईत 1 डिसेंबर 2021 रोजी दिली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल केला
होता. आरोपीला शुक्रवारी (दि.5) बारामती न्यायालयात (Baramati Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 11 जानेवारीपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली. (Pune Crime)

 

अशी करत होता फसवणूक

आरोपी चौटाला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात (Rui Government Hospital) ‘स्विपर’ म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असून देखील शादी डॉट कॉमवर (Shaadi.com) मुलींना ‘रिक्वेस्ट’ पाठवत होता. सरकारी नोकरी (Government Job) असल्याचे सांगून त्यांच्यासोबत मैत्री करुन जवळीक साधायचा. त्यानंतर मुलींच्या घरच्यांना भेटून त्यांचा देखील विश्वास संपादन करत होता. मुलीला पर्यटनाला घेऊन जात मुलीशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यानंतर पैशांची गरज असल्याचे सांगून मुलींकडून पैसे उकळत असल्याचे तपासात समोर आले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भोरमधून केली अटक

आरोपी चौटालाचा पोलीस शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे (API Yogesh Langute) यांना माहिती मिळाली की, आरोपी हा पुण्यातील एका मुलीसोबत नेहमीप्रमाणे खोटे बहाणे करुन तिला पळवून आणून भोर येथील एका रुमवर राहत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बारामती तालुका पोलीस ठाण्यातील (Baramati Taluka Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, दत्तात्रय मदने, चालक तुषार लोंढे यांच्या पथकाने केली.

 

Web Title: Pune Crime | health worker cheating girls lures marriage baramati taluka police of pune rural arrest him

 

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | ‘इथं’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 23.39% वाढ, बरोबर सेवानिवृत्तीच्या वयातही वाढ

Kirit Somaiya | 10 दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार

Pune Crime | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन

 

Related Posts