IMPIMP

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीचे बॅनर्स; परंपरा अखंड राहू द्या म्हणत दिल्या शुभेच्छा

by nagesh
Dasara Melava 2022 | ncps banner for shivsenas uddhav thackeray Dasra Melava 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  यावर्षी शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा (Dasara Melava 2022) आणि शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा असे दोन मेळावे होणार आहेत. शिवसेनेचा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर बंडखोर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीतील मैदानावर (BKC Ground) होणार आहे. शिंदे गटाला सुरूवातीपासनूच भाजपाची (BJP) मजबूत रसद मिळत आहे. शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही, हे भाजपाचे कारस्थान असे शिवसेनेने देखील म्हटले आहे. अशाप्रकारे भाजपा शिंदे गटाच्या पाठीशी उभी आहे. आता दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) निमित्ताने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षसुद्धा शिवसेनेसोबत ठामपणे उभा राहिल्याचे मुंबईत लागलेल्या बॅनर्सवरून दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या मातोश्रीबाहेर लावलेला एक बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीने मुंबईत हे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), सचिन अहिर (Sachin Ahir), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो आहे.

 

एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) परंपरा अखंड राहू द्या, खूप खूप शुभेच्छा, असे म्हणत राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई सचिव दिनेशचंद्र हुलवळे (Dineshchandra Hulawle), राजू घुगे (Raju Ghuge) यांनी हे बॅनर्स लावले आहेत.

 

ठाकरे गटाने (Thackeray Group) दसरा मेळाव्याजी जोरदार तयारी केली आहे. शिवतीर्थावरील (Shivtirtha) दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची (Shiv Sainik) गर्दी जमण्याची योजना आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी पदाधिकार्‍यांना दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी अवाढव्य खर्च करत जय्यत तयारी केली आहे.
सर्व आमदार, नेते मुंबईत दाखल झाले आहेत.
मेळाव्यासाठी माणसे आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो गाड्या बुक करण्यात आल्याचे त्यांचे आमदार सांगत आहेत.

 

शिंदे गटातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी लोक घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकटे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी 300 एसटी बस बुक केल्या आहेत.
तर शिंदे गटातील आमदारांनी 4 हजार 500 गाड्यांची मागणी महामंडळाकडे केली आहे.
शिंदे गट 5 लाख लोकांना बीकेसीच्या मैदानावर आणणार आहे.

 

 

Web Title :- Dasara Melava 2022 | ncps banner for shivsenas uddhav thackeray Dasra Melava 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अग्नीपथ साठी बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या दोघा एजंटांना अटक; मुंबई परिसरात रहात असल्याचे काढून दिले डोमिसाईल

New English Medium School (NEMS) Pune | न्यू इंग्लिश मिडीयम प्राथमिक शाळेत भोंडला आणि गरबा जल्लोषात साजरा झाला

 

Related Posts