IMPIMP

Deepak Kesarkar On Aditya Thackeray | दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना खडसावले; म्हणाले – ‘आम्हाला ‘गद्दार’ म्हणताना दहावेळा विचार करा’

by nagesh
 Deepak Kesarkar On Aditya Thackeray | eknath shinde camp spokeperson deepak kesarkar slams shivsena leader aaditya thackeray

शिर्डी : सरकारसत्ता ऑनलाइन Deepak Kesarkar On Aditya Thackeray | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या अनेक आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविषयीही नाराजी असल्याचे दिसत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा पुन्हा एकदा गद्दार म्हणून उल्लेख केल्याने दिपक केसरकर संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. “तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात. कसे बोलावे हे उद्धव साहेबांकडून शिका, संजय राऊतांकडून शिकू नका,” असा सल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. गद्दार हे गद्दारच आहेत. मात्र, ज्यांना वाटते त्यांनी अजूनही परत यावे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Deepak Kesarkar On Aditya Thackeray)

 

“आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. तुम्ही गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्य साहेबांपेक्षा दुप्पट वयाचा माणुस आहे. मात्र, जेव्हा आदित्य साहेब येतात तेव्हा मी उठून उभा राहातो, कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव‌ ठाकरेंचा आहे. तुमच्याकडे तो वारसा आला त्यामुळे तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे. आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव साहेबांकडून शिकावे, त्यांनी ते राऊतांकडून शिकू नये,” असा सल्ला केसरकर यांनी दिला.

 

Web Title :- Deepak Kesarkar On Aditya Thackeray | eknath shinde camp spokeperson deepak kesarkar slams shivsena leader aaditya thackeray

 

हे देखील वाचा :

MP Rajendra Gavit | ‘राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला पाठींबा द्या’; शिवसेनेच्या ‘या’ खासदारांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Vasant More | ‘हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा’ – मनसे नेते वसंत मोरे

Chhagan Bhujbal | …म्हणून अनेकजण शिवसेनेतून भाजपात गेले – छगन भुजबळ

 

Related Posts