IMPIMP

Chhagan Bhujbal | …म्हणून अनेकजण शिवसेनेतून भाजपात गेले – छगन भुजबळ

by nagesh
Chagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on rahul gandhi savarkar statement

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Chhagan Bhujbal | येवला दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे गट आणि भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) टिकावी, अशी प्रामाणिक इच्छा आहे. मात्र अनेकजण ईडीच्या (ED) धाकापोटीच भाजपसोबत गेलेत. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे मी उद्‌घाटन केले. अनेक आमदारांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी, असे माझ्यासह कोणालाही वाटत नाही.’ असं भुजबळ म्हणाले.

 

“लग्न झाल्यावर आपण लगेच घटस्फोट घ्या, असे म्हणत नाही. त्यामुळे ‘नांदा सौख्यभरे’ अशा शुभेच्छा मी देतो, आशा मिश्कील शब्दात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भूमिका मांडली आहे. राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारने जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सेनेत काही मतभेद असू शकतील. मात्र संघटना संपावी असे कोणालाही वाटत नसल्याचं,” ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे,
तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खतेवाटप करताना अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.
विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना बियाणे, खत खरेदी करताना इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
विक्रेता सक्ती करीत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.” असं भुजबळ म्हणाले.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | NCP leader chhagan bhujbal reaction on shiv sena mla revolt and cm eknath shinde balasaheb thakceray

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले – “गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा”

Shinzo Abe | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार; सर्वत्र खळबळ

Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ठाणे, पालघरला ‘रेड अलर्ट’

 

Related Posts