IMPIMP

Devendra Fadnavis | ‘राज्यसभेतील भाजपचा विजय हा लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis | bjp victory dedicated laxman jagtap mukta tilak devendra fadnavis rajya sabha elections 2022

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) भाजपचे (BJP) तिन्ही उमेदवार निवडून आले आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होती. त्यामध्ये भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना निवडणुकीचे किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांना समर्पित आहे,’ असं म्हणत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आमदार जगताप यांची प्रकृती मागील दोन महिन्यांपासून नाजूक आहे. जवळपास दीड महिन्यांच्या उपचारानंतर मागील आठवड्यात त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अजूनही ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत व घराबाहेरही पडत नाहीत. त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. अशा परिस्थितीतही फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विनंतीनुसार आणि डॉक्टरांच्या संमतीने जगताप यांनी रुग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन राज्यसभा निवडणुकीतील मतदानात सहभाग घेतला. तसेच मुक्ता टिळक यांनीही मतदानात सहभाग घेतला. अटीतटीच्या लढतीत भाजपचा तिसरा उमेदवारही निवडून आला. त्यामुळे भाजप वर्तुळात जल्लोष सुरू आहे.

 

दरम्यान, त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजपचे हे यश, आमदार जगताप तसेच टिळक यांच्या लढवय्येपणाचे आहे.
हा विजय त्यांना समर्पित करतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp victory dedicated laxman jagtap mukta tilak devendra fadnavis rajya sabha elections 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातच मोक्का गुन्ह्यातील आरोपीला दिला गांजा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना प्रकार घडल्याने खळबळ

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यामध्ये (DA) 5 टक्के वाढ निश्चित; जाणून घ्या

Pune Crime | कोथरुड परिसरात दुकान चालविण्यासाठी दररोज 1 हजारांची खंडणी; कोयत्याचा धाक दाखवून गुंडांनी गल्ल्यातील रोकड नेऊन दुकानाचा बोर्ड जाळला

 

Related Posts