IMPIMP

Devendra Fadnavis | नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे, देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis along with sanjay raut and nana patole criticized maha vikas aghadi

अहमदनगर :  सरकारसत्ता ऑनलाईन- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सतत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका करत आहेत. त्यांवर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाना पटोलेंसह (Nana Patole) विरोधकांवर टीका केली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे असून आम्हाला खूप काम आहे, त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही अशी टीका फडणवीस यांनी केली. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) भाजपमध्ये (BJP) समन्वय असून आमच्यात कोणतीही अडचण नाही. गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी 22 जागांवर दावा केला नसून आमच्या युतीत कोणतेही मतभेद नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारत असताना त्यांनी कोण संजय राऊत? असं म्हणत टीका केली.

 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1661999159313043458?s=20

 

एका दगडात दोन पक्षी

युतीत कोणतेही वाद नसून जरी असले तरी चहाच्या कपाएवढे आणि ते शमले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काहीही झालं तरी त्याचं खापर भाजपवर फोडलं जातं, इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्याला आमचा हात आहे असं म्हणू नये म्हणजे झालं, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

 

यावेळी महसूल मंत्री (Revenue Minister) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि
भाजप आमदार राम शिंदे (BJP MLA Ram Shinde) यांच्यामधील वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,
दोघांमधील वाद एका पेल्यातील वाद आहे. तो आता थांबलेला आहे. तो किरकोळ वाद होता.
मी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आहे. त्यामुळे तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे,
असे सांगत त्यांनी दोघांमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis along with sanjay raut and nana patole criticized maha vikas aghadi

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

Maharashtra Police Inspector (PI) Suspended | न्यायाधीशांशी केलेले गैरवर्तन भोवले! वादग्रस्त पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, ज्या ठाण्यात प्रभारी तेथेच FIR

 

Related Posts